Share

प्रा. मिलिंद बेडसे( इंग्रजी विभाग प्रमुख- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर)
*परिचय:*
देव झालेला कुणी ही दीर्घ कथा छोट्या कादंबरीच्या स्वरूपात प्रकाशित झाली आहे. ही दर्शनीक विचारावर आधारित कादंबरी असून लेखक प्रा. ईश्वर कणसे यांनी जगात देव आहे की नाही यावर सामान्य स्तरावर उहापोह करण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. कादंबरीला प्रस्तावना डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिली आहे. डॉ. शेलार हे सत्यशोधक चळवळीशी संबंधित असून देव न मानणाऱ्यापैकी आहेत.
*कथानक:*
या अनंत आणि अफाट विश्वास देव आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावर समाजात अस्तिक व नास्तिक असे दोन सरळ वर्ग पडलेले दिसतात. प्रा. कणसे यांनी या अनुषंगाने एका कुटुंबातील संघर्ष या दीर्घकथेत उभा करून या विषयाला वाचा फोडली आहे. या कथेतील नायक हा नास्तिक असून त्याची पत्नी ही आस्तिक आणि देवावर श्रद्धा असल्याचे दाखवण्यात आले आहे. माणसाची श्रद्धा आणि प्रगत विज्ञानाचे संदर्भ देत त्यांच्या कथेतील विविध व्यक्तिरेखा आपापली भूमिका मांडताना दिसतात.
*शैली आणि मांडणी:*
लेखक ईश्वर कणसे यांनी देवजाणिला कुणी या कादंबरीसाठी अत्यंत साधी सोपी परंतु प्रभावी शब्दांची भाषा वापरली आहे. कादंबरीत देव हे नाव असल्यामुळे अनेकांना यात संस्कृत श्लोक, वेद, अभंग आदीचा वापर केला असावा असे वाटते. परंतु अध्यात्मातले कुठल्याही संदर्भ न वापर करता एक ग्रामीण भागातील बोली भाषा वापरली आहे. विज्ञानाचे संदर्भ ही जोडलेले नाहीत. साध्या सरळ आणि सर्वसामान्यांना समजेल अशा रहस्य उलगडा कथानक रूपात साकारला आहे. ईश्वराच्या अस्तित्वा वरील इतका मोठा दर्शनीक विचार त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या भाषेत आणि शैलीत वदवून घेतला आहे. कादंबरीची मांडणी साध्या सरळ स्वरूपात मांडल्यामुळे कथानक उलगडताना वाचकांना पुढे काय याची आस लागून राहते.
*विशेष वैशिष्ट्ये:*
दर्शनीक विचारावर सहसा साहित्य सापडत नाही. मात्र ईश्वराविषयीचा एवढा मोठा दर्शनीक विचार सामान्य पातळीवर मांडणे हे लेखकाचे मोठे शैली कौशल्य आहे.
कथेतील नाट्यमयता व ईश्वर रहस्य कुतूहल निर्माण करते.
*समारोप:*
या अफाट प्रमाणाचे नियंत्रण करणाऱ्या महान ईश्वर शक्तीचा शोध घेणारी कादंबरी म्हणजे आस्तिक नास्तिकांसाठी एक आरसा आहे. कादंबरीतील पात्र कथानका विषयी कुतुहल निर्माण करतात. ही छोटी कादंबरी या मोठ्या समस्येचे सरळपणे उकलन न करता त्याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी आहे आपल्या वाचकांच्या सदसदविवेकबुद्धीवर सोडून देते. म्हणूनच या कलाकृतीला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

Related Posts

भारतीय समाजावर प्रभाव

Ishwar Kanse
Share(प्रा.सहदेव रोडे, इतिहास विभाग प्रमुख, शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर) “भारतातील बौद्धधम्म” हे गेल ऑम्वेट या अमेरिकन स्त्रीवादी व आंबेडकरवादी लेखिकेने...
Read More

Autobiography

Ishwar Kanse
ShareStudent: Sayali Santosh Zolekar College : Sinhgad College of Engineering पुस्तकाचे शीर्षक : मन मैं हैं विश्िास लेखक : मा.विश्िास...
Read More