Share

Book Reviewed by गौरी संजय चव्हाण (१२ वी कला)
MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik

एखादी गोष्ट जर यशाने प्राप्त करायची असेल तर तिच्यात सर्वप्रथम आपण आपले मन , वेळ, सहभाग नोंदवायला हवा. आणि आपण त्या गोष्टीवर ठाम ही असायला हवा.आणि आपण त्या गोष्टीवर ठाम ही असायला हवे. जर आपल्याला तिच्यात सहभाग नोदवायचा असेल तर आपल्या मध्ये असलेली वृत्ती कोणत्याही परिस्थितीत किंवा प्रसंगांकडे आपल्या बघण्याचा दृष्टीकोन हवा असे शिव खेडाचे मत आहे.

त्यानी असे सांगितले आहे की जर लोकांचा दृष्टकोन चांगला असेल तर आपण केलेली कामगिरी उतकुष्ट असते .

आजच्या युगातील महत्त्वाचा शब्द असेल तर तो आहे दृष्टीकोन. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची मनोवृत्ती त्यामुळे आपले विचार बनतात तसेच आपले वर्तन,वागणे,बोलणे यावरही परिणाम होतो त्यांनी असे सांगितले आहे की एखाद्या ऑफिस मध्ये जर आपण आपली मुलाखत द्यायला गेलो तर ते फक्त 15% आपण किती हुशार आहोत हे बघितले जाते उरलेले 85% आपल्याला त्या क्षेत्राबद्दल किती बघितले जाते.

त्यांनी त्यांच्या या पुस्तकात असे सांगितले आहे की आपल्या सभोवताली असलेले वातावरण कौटुंबिक अथवा कामाचे ठिकाण ,समाजातील वातावरण आपले दृषटिकोन घडवत असतो. जर नियम बनवणारेच जर कायद्याचे उल्लंघन करत असतील तर खरच संस्कृतीचा स्थर खाली जात आहे . तसेच आयुष्यात येणारी अनुभव ही आपल्या खूप काही शिकवून जातात. अनुभवामुळे आपण आपला द्रुष्टीकोन बनवु शकतो . तसेच शिक्षण ही आपल्या विचारांना विस्तृत करते . हे आपल्यावर अवलंबून असते की आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपण काय करतो आणि ते देखील आपल्या मूल्यावर अवलंबून असते.

तसेच सुर्वातीत शिवखेडानी आपल्याला जिवंत जगण्याचा एक मार्ग सांगितला आहे. ” विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात.”

शीव खेरा यांनी या पुस्तकात सांगितलेल्या बाबी विषयी आपण नक्कीच विचार करायला हवा . आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपण कसे सामोरे जातो याचे मुल्याकन करायला हवे .

Related Posts

गांधारी

Yogita Phapale
ShareReview By Prof. Priyanka Pravin Mahajan, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune महाभारत या महानाट्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यामध्ये अनेक...
Read More