Share

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.
शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.
आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाच्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.

Related Posts

माळावरची मैना

Tanaji Mali
Shareआनंद यादव यांच्या कथा अस्सल ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण भागात असणारी अनेक स्वभावाची माणसं यात वाचायला मिळतात. ग्रामीण भागात जे...
Read More

महापुरूषांच्या दिव्यकर्तृत्वाची प्रेरणादायी यात्रा

Tanaji Mali
Shareपुस्तकात भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महापुरूषांच्या शिकवणीची शिदोरी आहे. गांधीजी, टिळक, टागोर, नेहरुंच्या विचारांचा परिसस्पर्श आहे. साने...
Read More