मुंबई विद्यापीठातील इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. नारायण भोसले यांचे देशोधडी हे आत्मकथन आहे. नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातींत जन्म घेऊन प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास याचे वर्णन यात आहे. परंतु हा प्रवास अत्यंत खडतर, कष्टप्रद आहे. आत्मकथनामध्ये या खडतर प्रवासाचे प्रदर्शन न करता अतीशय वास्तववादी पद्धतीने लेखक याची मांडणी करतात. भटक्या समाजाचे दुःख, कष्ट, हालअपेष्टा यांचे चीत्रण या पुस्तकामध्ये अनुभवायला मिळते. त्यांच्या कुटुंबाची भटक्या जमातीमधील परिस्थिती, त्यातून निर्माण झालेले आर्थिक आणि सामाजिक आव्हानं, आणि त्यातून शिक्षण घेऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा संघर्ष याबद्दल ‘देशोधडी’मध्ये माहिती दिली आहे. लेखकाने पूर्ण प्रामाणिकपणे आणि वास्तववादी पद्धतीने आत्मकथन केले आहे. नाथपंथी डवरी गोसावी ही भटकी जमात असून विविध प्रदेशांत भटकणे आणि भीक मागून उदरनिर्वाह करणे हाच या जमातीचा मुख्य व्यवसाय आहे. यात त्याना अनेक संघर्ष करवे लागतात. पुस्तकात वाचकांना भटक्या लोकांचा जीवन संघर्ष अनुभवायला मिळतो. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण दु:खी होत असतो, परंतु हे पुस्तक वाचल्यानंतर समजते की आपण खरंच खूप सूखी आहोत. वैशिष्ट्यपूर्ण असे आत्मकथन वाचनीय आहे.
Related Posts
Shareफकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१...
Share Anil M Dalvi, Librarian, JSPM Narhe Technical Campus, Narhe, Pune कार्व्हरची कहाणी धैर्य आणि चिकाटीची आहे. ती तुम्हाला दयाळूपणा....
ShareRaut Jyoti Vijay Student (3rd Year B.Voc in Renewable Energy – Skill Development Centre, Savitribai Phule Pune University Book Review:...
