Share

जेरुशा उर्फ ज्यूडी – एक सुंदर, तरुण मुलगी परंतु अनाथ.
अनाथालयात वाढलेल्या जेरुशाची बुद्धिमत्ता पाहून त्या अनाथालयाचे एक विश्वस्त तिच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. त्यासाठी एकच अट असते. ज्यूडीने तिची प्रगती त्या निनावी विश्वस्तांना पत्रातून कळवत रहायचे. तिने त्या विश्वस्तांना एकदाच ओझरते पाहिलेले असते. त्यावेळी तिला फक्त लांब टांगांचा, उंच माणूस दिसलेला असतो. म्हणून ती त्यांना **डॅडी लॉंगलेग्ज** असे म्हणते. डॅडी लॉंगलेग्जना ज्यूडीनं पाठवलेली अतिशय सुंदर पत्रे म्हणजेच ही आगळीवेगळी अप्रतिम कादंबरी. सुंदर, अनाथ मुलीचं भावनिक आयुष्य अलगदपणे उलगडत नेणारी ही कादंबरी नितांत सुंदर तर आहेच, परंतु तेवढीच नाट्यमय आणि आश्चर्यचकित करणारी आहे. फक्त वाचनवेडी व्यक्तीचं नाही तर ज्या व्यक्तीला वाचनाची आवड नाही अशी व्यक्ती देखील या कादंबरी ने वाचनाच्या प्रेमात पडेल यात शंका नाही.
सुंदर !!!

Related Posts

खरा शिवाजी राजा

Dr. Uday Jadhav
Share पुस्तकाची वैशिष्ट्ये 1. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व: पुस्तकात शिवाजी महाराजांच्या शौर्य, साहस, बुद्धिमत्ता आणि लोककल्याणकारी कार्याचे सुस्पष्ट वर्णन आहे. 2....
Read More