Share

डॉ. सागर भालेराव आणि अनिकेत घुले या चळवळीतील तरुणांनी लिहिलेले ‘युवक व युवतींसाठी: लोकशाहीच गाईड‘ हे लोक प्रबोधिनी, महाराष्ट्र बेला पब्लिकेशन्सचे ७७ पृष्ठांचे छोटेशे पान अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचे नुकतेच २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशन झालेले आहे. संविधानिक मुद्द्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. प्रकाशनाचे औचित्य म्हणजे ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…” असे मानवी मूल्य सामाजाविणाऱ्या साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती निमित्ताने त्यांनाच अर्पण केले आहे. लोकशाहीचे गाईड हे पुस्तक एकूण आठ प्रकरणात विभागणी केलेली आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये वस्तुनिष्ठ, मुद्देसूद विवेचन व अतिशय उत्कृष्ठ मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्ये सांगता येईल. उदा. पृ.७- संविधानिक व्यवस्थेचे पैलू. पृ.८- Indian Penal Code. पृ.९- एक व्यक्ती एक मत. पृ.९- एक व्यक्ती एक मत पृ.१५- राज्य म्हणजे काय? पृ.१९- भारत माझा देश/- प्रार्थना पृ.५७- मार्गदर्शक

Related Posts