उपरा या आत्मकथेतून लक्ष्मण माने लेखकांनी आपल्या जीवनातील संघर्षाची ठिणगी मानव मुक्तीच्या ध्येयाकडे घेऊन जाताना दिसते.
पिढ्यानपिढ्या गाढवाच्या पाठीवर बिऱ्हाड बांधून भटकणाऱ्या व आपल्या पोटासाठी गावोगावी फिरणाऱ्या मंडळींच्या वेदना दुःख आणि त्यांनी भोगलेले कष्ट आपल्यासमोर या पुस्तकातून मांडलेले दिसून येते. लेखकांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलं आहे, त्यामध्ये जातीयतेची विषमता आपल्या समाजात तीव्र पद्धतीने रुजलेली आहे. जातिवाद, अंधश्रद्धा, चालत आलेल्या रुढीपरंपरा, समाजात होत असलेली उच्च – निच्छ तेची वागणूक, आपल्या पदरात आलेली गरिबी, जातपंचायतीमध्ये चालणारे न्याय- निवाडे.
जेव्हा आपण हे पुस्तक वाचताना लेखकांनी जे जे लिहिलं, जे जे भोगलं, ते ते अनुभवत जातो. ही मंडळी गावाच्या बाहेर पाल उभा करून, त्या उकंडयावरच्या तीन दगडाच्या वर उभा असलेला त्यांचा संसार, दिवसभर गाढवा मागे राहणे.
लेखक म्हणतात की, समाजामध्ये होणाऱ्या स्त्रियांवर किती ही अत्याचार सहन करावा लागला तरी त्याच पुरुषाबरोबर संसार करावा लागायचा. लेखक आपल्या आई-वडिलांची बद्दल सांगतात ते म्हणतात बाप आईला मारायचा. एके दिवशी मला बाबानीं शाळेत धाडायचं निर्णय घेतात मी नाही जाणार म्हणून रडायचो, व आईला बोलायचो आणि आईने माझ्या बाजूने बोलत होती की तो शाळेत जाऊन काय मास्तर फिस्तर होणार आहे का ? नका पाठवू त्याला शाळेत त्यावर बानं आईला फोकाच्या लाकडांनी केलेली मार-मार तिच्या पूर्ण अंगावर उंमगलेले ओळ, त्या लाकडाचा मार आणि ती वळ बघून कधीच इच्छा झाली नाही की मी शाळेत जाणार नाही असं बोलायची बाबाला. लग्न कार्या मध्ये खांदे दु दुःखजेपर्यंत ढोलकी वाजवणे व उकंड्यावर वेगळ्या पंक्तीत जेवणे. लेखक सांगतात की एखाद्या प्राण्याला तरी जेवण भेटायचं चांगलं आम्हाला त्याच्याबरोबर भांडण करून मिळवावा लागायचं. ते म्हणतात गावाच्या एका लग्न समारंभात शेवटी जेवणाचे पत्रवाळ्या उकंड्यावर फेकायचे आणि त्या उकंड्यावर फेकलेले काही अन्नाचे दाणे मिळवण्यासाठी कुत्र्यासोबत भांडण करावी लागायची. कधी कधी तर दोन-तीन दिवस उपाशीपण राहावं लागायचं.
लेखक आपल्या कॉलेजमध्ये भेटलेल्या मित्रांची व चित्रपट पाहण्यासाठी केलेली धडपड आणि मला पण पाहता यावं मित्रांबरोबर चित्रपट यासाठी दिवसभर त्या चित्रपटाच्या बाहेर मित्रांना तिकीट काढून देण्यासाठी दिवसभर थांबणे व त्या तिकीटा मागे काहीतरी पैसे उरावेत आणि आपण तो चित्रपट पाहिला मिळेल यासाठी केलेली धडपड. आणि आयुष्यात एक मित्र त्याच्या येण्याने बऱ्याच साऱ्या गोष्टीला पूर्णविराम मिळाला. त्याची साथ कायमच लाभत राहिली. समाजाची अशिक्षितपणा पावसाला सोडून गावोगावी आपल्या पोटासाठी भटकायच आणि चैत्रीच्या पौर्णिमेला देवीची जत्रा तिच्या प्रकोपाने आपल्याला काहीतरी होईल या भीतीने ते नवस करायचं आणि ते नवस केलेलं, ते फेडण्यासाठी वर्षभर जमवलं पैसे ते खर्च करायचं, लागलं तर कर्ज पण घ्यायचं पण त्या नवस पूर्णपणे आणि थाटामाटा फेडायचा आणि परत ते कर्ज फेडण्यासाठी गावोगावी भटकायचं. एवढ्या हाल अपेक्षाच जगण असताना सुद्द्धा लेखकांनी आंतरजातीय विवाह केला. लग्नानंतर आपल्यामुळे पत्नीला होणारे हाल-अडचणी , दु:ख तिच्या सुवर्ण आयुष्यला आपणच ग्रहण लागलो काय हेय मनात कायमच वाटू लागलं.ती श्रीमंत घराची मुलगी आणि आपल्यामुळे तिचे होणारे हाल, एका वेळेचे जेवण मिळवण्यासाठी होणारे हाल आणि काही वेळा तर उपाशी पण रहाव लागायच.असंख्य दु:ख कष्ट त्याच जोडीला सोबत बऱ्याच जणांची वेळोवेळी लाभत राहिली मदत हे सगळे प्रसंग वाचताना अंगावर कट यायचं, अनेक सामाजिक संस्थाकडून होणारी मदत. आपला समाज जरी दारिद्याच्या खाली असला तरी आपण आंतरजातीय विवाह केला म्हणून आपल्या कुटुंबियातील लोकांना समाजाकडून वाळीत टाळणे. कैकाडी समाजावर होणारे अन्याय, लेखकांनी भोगलेले दु:ख जालेले प्रसंग या पुस्तकातून वाचताना अनुभवता. आणि आपल्याला समजते कि आपल्याला आलेले आयुशातले दुख या पुढे काहीच नाही. हेय “उपरा”या पुस्तकातून आपल्याला जाणवते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंच आहे “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो प्राशन करेल तो गुर्गुर्ल्याशिवाय राहणार नाही. “या पुस्तकातून आपल्याला खऱ्या अर्थाने भेटते जातीय व्यवस्था, विषमता, दारिद्र्य, दुख, पिढ्यानपिढ्या होणार्या अत्याचार आणि या अत्याचारांमध्ये जगणारे असंख्य माणस. आपल्याला जाणत कि हेय वाक्य फाख्त माणसाने माणसाची माणसासम वागावे हे फक्त पुस्तकापुर्तच आणि म्हण्यापुरतच मर्यादित आहे.