कु. आहेर वैष्णवी बाळासाहेब ( टी वाय बी एस सी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जि. अहिल्यानगर
परिचय:
मृत्युंजय कादंबरीची निर्मिती शिवाजी सावंत यांनी केली आहे. हे पुस्तक जाड आणि मोठे वाटत असले तरी वाचताना कधी संपते तेही कळत नाही कादंबरीत महाभारतातील कर्णाच्या जीवनाची कथा मांडली आहे. भारतीय पौराणिक कथांतील एक दुर्दैवी पण आदर्शवादी व्यक्तिमत्त्व म्हणून कर्णाची ओळख आहे. कर्णाचा संघर्ष, त्याग, अभिमान, आणि निष्ठेची पराकाष्ठा दाखवली आहे.
कथानक:
मृत्युंजय ही कादंबरी कर्णाचे आत्मचरित्र आहे. लेखकाने कर्णाच्या जीवनाचा वेध घेत, त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेतला आहे. कथा करण्याचा एक एक पैलू उलगडून दाखवत आहे.
कर्ण हा सूर्यपुत्र असूनही वेळोवेळी अपमानित व्हावे लागले. त्याला समाजाने क्षत्रिय म्हणून मान्यता दिली नाही. त्यामुळे उपेक्षित जीवन जगावे लागले. जन्मतः मातृ-पित्याचा त्याग आणि समाजातील अपमान सहन करत, त्याने संघर्षावर मात केली.आपल्या आयुष्याला आकार दिला. त्याच्या आयुष्यात दुर्योधन मित्र म्हणून लाभला. कर्णाने दुर्योधनाशी असलेल्या मैत्रीला अखेरपर्यंत प्रामाणिक जागला व महाभारतातील युद्धात कौरवांसाठी लढला.
शैली आणि मांडणी:
मृत्युंजय या कादंबरीसाठी अतिशय चांगली आणि प्रभावी भाषा वापरली आहे. लेखक शिवाजी सावंत यांनी पात्रांच्या भावनां आणि विचार मोठ्या उंचीवर पोहोचवले आहेत. लेखकाने महाभारतातील घटनांची नव्याने सांगड घालत कर्णाला न्याय देण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे.
कादंबरीत वेगवेगळ्या पात्रांचा कथानक उलगडत केलेले मांडणी मनाला भावून जाते. अधिक गुंतागुंतीची आणि भावनिक बनली आहे. त्यामुळे कादंबरी वाचकाला वेगळ्या वातावरण घेऊन जाते.
विशेष वैशिष्ट्ये:
कर्णाचे व्यक्तिमत्त्व साकारण्यात लेखक यशस्वी.
कथेतील मांडणे भावनिक आणि गुंतागुंत निर्माण करणारी.
उपेक्षित पात्राला उंचीवर घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न.
समारोप:
मृत्युंजय कादंबरी मनोरंजनासाठी नसून जीवनाचा यथार्थ अर्थ त्यात सामावला आहे. कर्णाचा संघर्षमय जीवन प्रवास उपेक्षतांना बळ देण्यास, निश्चित उपयोगी पडेल. कादंबरी वाचकाच्या मनाला विचार करायला लावते. कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करून उपेक्षतांपर्यंत जीवनाचा वेगळा संदेश देण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.