Share

आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही कधी समजून घेतलं का तिला एक कविता
आईसाठी आज स्वतःला जाब विचारा आईसाठी आपण काय करतो . त्याचा आढावा
घ्यावा .आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय ….आपण
जेवायच्या आधी आईस ताट करती वाढले बरं ..तुम्ही घरी येताना आईसाठी कधी
काय आणलं बरं ..तुम्ही सांगा तुमच्या आईचा आवडता रंग कोणता ?आईला हवं ते
मिळू दे अशी कधी प्रार्थना केलीये? आई करते आपण करत नाही .पाहिले का कधी
आई शेवटची ऑनलाईन कधी आली. तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मैत्रिणींना
बोलून देतो हे सगळं तीच करते. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो का ?
तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन भरून येतं. पण आपण मात्र बोलताना
शिव्या आई वरूनच देतो. लक्ष ठेवून ती नेहमी आपल्या बाळासाठी हात पसरते
..कधी देवापुढे तर कधी नशिबापुढे . तर माझ्या बाळाचं भलं कर . आईची आई
म्हणून बाळा कधी वागलास का ? तिचा खडबडीत हात घेऊन एकदा बघ ना.
कितीही कर्तुत्व गाजवा आपली झेप कमी पडते .आईने कडेवर घेतल्यावरच आपली
उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा मारता आईच्या पोटी
जन्माला येता आणि देव कुठे म्हणता .आईला सतत मुलांचा ध्यास त्यांचा भास
आणि त्यांच्या प्रेमाची धुंदी. नको कुणाची स्पर्धा. नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं
का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा.

Related Posts

ययाती जीवनाच्या संघर्षातून तत्त्वज्ञानाचा शोध

Pradeep Bachhav
Shareययाती जीवनाच्या संघर्षातून तत्त्वज्ञानाचा शोध book review by Deepali Anil Marne MSIHMCT Pune पुस्तक परीक्षण: “ययाती” लेखक: वि.स.खांडेकर प्रस्तावना पुस्तकाचे...
Read More