‘मटकावाल्याचे पोर ते प्राध्यापक’ हे प्रा. डॉ. दत्तात्रेय फलके यांचे आत्मचरित्र. स्नेहवर्धन प्रकाशनाने ०१ मे २०२२ मध्ये प्रकाशित केले. साठोत्तरी मराठी साहित्यात दलित आत्मकथनानंतर अनेक स्तरातून आत्मकथने येऊ लागली. हा दलित आत्मकथनाचा मराठी साहित्यावरील प्रभाव आजही महत्त्वाचा
ठरतो आहे. ग्रामीण, आदिवासी समूहाची आत्मचरित्रे तर आली परंतु मधल्या कष्टकरी समूहातील आत्मचरित्रे अपवादानेच आली.