Book Review by Bachhav Nikita Jibhau, SYBA, Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकर लिखित जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवन
चरित्र वाचुन खऱ्या अर्थाने सुंदर सुरुवात झाली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
श्रमलेल्या, काबाड कस्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञांचं उभ्या
हयातभर अखंड अविरत जीवनप्रवास या पुस्तकात सांगण्यात आला आहे. एका
विदेशी व्यक्तीबद्दल विस्तारित आणि त्यांच्या मुळाशी जाऊन सत्य माहितीची
पडताळणी करून ती पुस्तकी स्वरूपात समाजापुढे मांडताना लेखकांना किती कष्ट
घ्यावा लागल असेल हे पुस्तक वाचतांनाच समजतं. यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या
बालपणापासून तर त्यांच्या मृत्यू पर्येंतचा त्यांचा जीवनप्रवास आणि त्या प्रवासात
त्यांचे श्रम, त्यांची विचारसरणी, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तसेच त्यांनी
त्यांच्या वेळेला दिलेलं महत्त्व हे प्रत्येक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरते. आपल्याला
हवी ती गोष्ट करताना, कोणतीही तडजोड न करता जगणं, हे सुध्दा एक धाडस आहे.
कार्व्हरच्या आयुष्यातून हे धाडसच आपल्याला दिसतं आणि आपल्यातील प्रत्येकाला
प्रेरणा देत असते. प्रभावित झालेले अनेकजण कृषीनिगडित क्षेत्राकडे वळलेले
दिसतात. हे पुस्तक वाचून तुमच्या ओळखीमध्ये देखील असे काही जण असतील, जे
या पुस्तकामुळे, डॉ. कार्व्हर यांच्या प्रतिभेमुळे प्रेरित होऊन ‘कृषी’ क्षेत्रातील
अभ्यासक्रमाला गेले असतील.