लेखकाविषयी:
श्री अरविंद जोशी हे नाव लेखनाच्या क्षेत्रात नवे नाही एक गुणज्ञ आणि विधायक दृष्टी असणारा पत्रकार म्हणून ते सुपरिचित आहेत. अरविंद जोशी यांनी गुणीजनांची मांदियाळी व्यक्ती दर्शनाचा संग्रह लिहिला आहे. ओसाड मळा देखील रसाळ फळे देऊ शकतो. अशी अदम्य आशा शेतक-यांच्या ठायी निर्माण करणाऱ्या एका झुंझार आणि ध्येयमग्न माणसाची जिवनकहानी लेखकांनी ‘दुष्काळाशी दोन हात’ या चरित्रपर ग्रंथातून अतिशय प्रत्ययकारी शब्दात मांडली आाहे.
पुस्तकाविषयी :
‘दुष्काळाशी दोन हात’ या चरित्रग्रंथात लेखकानी, स्वातंत्र्यकाळात दुष्काळाशी झुंजत असणारा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती वर्णिली आहे. सोलापुर जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचा जिल्हा, आणि सततच्या दुष्काळामुळे ती सतत आगीत भाजताना दिसायचा. शेतकऱ्यांची विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्यांची दैत्य अवस्था, रोजची मीठभाकरी भागवण्यासाठी आणि दुस्काळात टिकाव लागण्यासाठी घरासमोरच्या दावणी रिकाम्या कराव्या लागत असत. एकेक जनावर खाटकाच्या हवाली करून शेतकरी अधाशी व्हायचा. पाऊसपाणी झालं की पुन्हा तडजोडीला लागायचा. कुठं सगळ थारयावर येतय तोपर्यंतच पुन्हा दुष्काळ दारासमोर ठाकलेला असायचा. ही सोलापूर जिल्ह्याची कहाणी लेखक सिद्धप्पा आणि पर्वतम्मा या नवराबायकोच्या पात्रातून पुस्तकान मांडतात ज्याच्या ठायी जमिन-जुमला नाही अशा वेळी खेड्यातून शहराकडे प्रस्थान होणे साहजिक असत. वाढत्या शहरीकरणाची कारणेही लेखकांनी या पुस्तकात मांडली आहेत. काही लोक संपत्तीचा पारा सोडून जात नसत. चिवटपणान तिथच राहतात कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर. अशा परिस्थितीत वि.ग. राऊळ वाढत होते. त्यांचे स्वप्न आय सी. एस. व्हायचं होतं पण परिस्थितीनं मैट्रिकच्या पुढ शिकू दिलं नाही. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी राऊळांनी तलाठी पदासाठी अर्ज केला. आणि पुढचा प्रवास तलाठी म्हणून चालू झाला लहानपणापासून शेतीची आस्था होती. दुष्काळाशी सामना करण्याची एक आगळीक शक्ती त्यांच्या ठायी वास करत होती. त्यांनी नोकरी करता करता शेतीची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यांयी ग्रामविकासपदी बढ़ती झाली. त्याचकाळात राऊळांना महसूल खात्यात काम करण्याची संधी मिळाली. दुष्काळग्रस्त कुटुंबातल्या ५५ वर्षे उलटलेल्या वृद्धांना सरकारतर्फे डोल नावाची आर्थिक मदत दिली जायची. त्यावेळी राऊळ डोल वाटप करण्यासाठी एका गावात गेले असता लोकांशी गप्पा मारताना त्यांना चिंचेचे वरदान समजले. दुष्काळ असले की या झाडाला भरघोस पिक येते. राऊलांच्या डोक्यात ठिणगी पेटली जर प्रत्येकाच्या शेतात चिंच असेल तर दुष्काळाशी लढन सोप पडेल. पण हे मानणारं कोणीच नव्हते. अशावेळी राऊलांना संधी चालून आली ती म्हणजे पं. पंडित नेहरूंनी दिलेले शेतकऱ्यांना आवाहन आणि त्यातुन उदयास येणारी शेतकरी मेळावा आणि शेतकऱ्यांची पस्तीस दिवसांची भारतदर्शन सहल जिल्हाधिकारी आर. एस . झुबेरी यांना राऊळांच्या अभ्यासाविषयी पुर्णपणे माहिती होती म्हणून त्यांनी राऊळांना सहाय्यक अधिकारी म्हणून सहलीसाठी निवडले. 1960 रोजी मेळावा आणि नंतर पं. नेहरूंनी आवाहन केल्याप्रमाणे भारत दर्शन सहलीची योजना. या सहलीमध्ये सोलापूर जिल्ह्यातले ११ तालुके प्रत्येक तालुक्याला रेल्वेचा एक डबा अशी ८८० शेतकऱ्यांची सहल होती. दुष्काळाला तोंड देण्याची धडपड असणार, दुष्काळी परिस्थिती वर्तविणार आणि विचार करायला लावणारे ते दिवस यातून निघणारा मार्ग हे सर्व बदलण्याची राऊलांची तळमळ या पुस्तकातून व्यक्त होते. राऊलांच्या मनात सतत एकच विचार यायचा तो म्हणजे “दुष्काळान विस्थापित होणारा शेतकरी स्थिर झाला पाहिजे”. राऊलांना उत्कृष्ट ग्रामसेवक, उत्कृष्ट तलाठी अशी पुरस्कारही भेटले. एखाद्या माणसाची महत्त्वाकांक्षा तीव्र असली की तिच्या पूर्ततेचा मार्ग त्याला आपोआप सापडायला लागतात आणि त्यामुळे असलेली संधी त्याच्यापुढे स्वत: होऊन हात जोडून उभ्या राहतात. त्याप्रमाणे राऊलांसाठी शेतकरी मेळावा आणि भारतदर्शन सहल या दोन संधी चालून आल्या. पस्तीस दिवसांची ही सहल. यात भारतातल्या विविध राज्यातील शेतीत सुरू असलेले नवे प्रयोग बघायला मिळाले. चा सहलीदरम्यान राऊळांना विकासाची दृष्टी असणारे लिमये यांचा सहवास लाभला. यातून एक सनदी अधिकारी कसा वागतो आणि कसं नियंत्रण ठेवतो हे राऊळांनी जवळून पहिले आणि ते आत्मसात केले. पुढे जाऊन राऊळांसाठी एक संधी चालून आली ती म्हणजे ‘कृषीशास्त्राची पदवीचं शिक्षण देण्याची योजना’ आणि राऊळांनी संधीचं सोनं केलं. अकोल्याहुन पदवीचे शिक्षण घेऊन येताना त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं, “सोलापुर, जिल्हयातल्या शेतकऱ्यांना स्थिर करायचं असेल तर कमी पाण्यावर येणाऱ्या बागांचाच शोध” यानंतर राऊळांना बढती मिळून ते कृषी अधिकारी झाले. त्यानंतर पुन्हा सहाय्यक जिल्हा कृषी अधिकारी म्हणून बढती मिळाली. शेतकऱ्यांशी नातं ठेवून त्यांनी डाळिंबाचा शोध घेतला आणि मग मार्केटिंग, राऊळांनी एक बदल केला तो म्हणजे आधी मार्केटिंग आणि मग उत्पादन. कमी पाण्यान देखील शेतकरी डाळिंब, बोर, चिंच अशी पिके घेऊन लाखो रुपये कमवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. बांधावरचे झाड शेतात कसं आणावं म्हणून राऊलांनी हा प्रयोग स्वत: घरी केला आणि यशस्वीरित्या पार पाडला.
वैशिष्ट्ये : ‘दुष्काळाशी दोन हात’ नावाप्रमाणेच दुष्काळाला ही खाली पाडेल अशा उमेदीवर जगणार हे आगळे-वेगळ वी.ग.राउल याचं व्यक्तिमत्त्व. शेतीविषयी संवेदना आणि आशेच जाळ विणणारे हे पुस्तक युवकांसाठी मोठे प्रेरणास्थान होऊ शकतं. फक्त शेतकरीच निसर्गावर पूर्णतः अवलंबुन असला तरी तो विज्ञानाची कास धरून प्रकृतीचा आधार घेऊन मोठी झेप घेऊ शकतो. स्वतःच्या कष्टाची किंमत स्वतः ठरवू शकते हे सांगून जाणारे हे पुस्तक एक सुवर्ण ग्रंथ ठरू शकत. विशेषत: शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी धडपड करणाऱ्या व्यक्तीला हा ग्रंथ एक दिव्य ज्ञानापेक्षा कमी भासणार नाही. कोणत्या परिस्थितीत कोणत पिक उत्तम असु शकतं याचा अंदाज आपल्या मनामध्ये या पुस्तकाचं सखोल वाचन करून बांधला जाऊ शकतो, शेतीविषयक प्रश्नांचे चिंतन, त्यावर सुचवलेले उपाय यामुळे शेतकयांसाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरू शकेल. माळाला मळा बनविण्याचे स्वप्न उराशी जपणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वि. ग. राऊळांची ही जीवनकथा निश्चितच प्रेरक ठरू शकेल. कारण ‘दुष्काळाशी दोन हात करू पाहवाया वि. गू राऊलांसारख्या कृषीभूषणाच्या कृतिशूर अशा दोन हातांची ही कहाणी आहे.