komal Bhavanathकविवर्य ‘प्रवीण दवणे’ यांच्या एक अप्रतिम काव्य संग्रह ‘ध्यानस्थ’ हा काही दिवसांपूर्वी वाचनात आला अतिशय साधी सरळ तरीही सूक्ष्म जीवन दर्शन घडवणारी शब्द रचना. यात प्रत्येयाला येते.
रात्री कविता स्वप्नात येतात
शरीरभर झिरपतात आणि जातात.
म्हणजेच जागृत अवस्थेची सीमा ओलांडून कवी मन अंतर्मुख झालेले यातून प्रत्येयाला येते त्या कवितेचा चेहरा मोहरा इतका एक रूप झालेला दिसतो की याची कविता अगदी नवं निर्मिती च्या दिशेने घेऊन जाते. तसंच माझ्यासारख्या वाचकला वास्तवाचे भान हरवत मानवी मनाच्या भाव विश्वाचा ठेव घेताना दिसतात तर त्यांचा सृजन या कवितेत निसर्गच्या ऋतूच्या माध्यमातून मानवी भावभावनांचे अतिशय सुंदर वर्णन आढळते.
मातीही इतकी घामघमते की ऋतू ने यावे शरण
आभाळाची घुसमट जंभाळे पणा सरसर गळून पडताना
या ओळीत पहिल्या पावसानंतर निसर्गच वर्णन करून चाकरमानी शेतकरी ते प्रेमियुगल ते सर्वसामान्य माणसाच्या भाव विश्वाचा ते अगदी सरईत पणे ठाव घेतात. यातून त्यांच्या काव्य लेखानाची प्रगल्भता आणि सरळ भाषा शैली यातून प्रत्येयला येते. तर ध्यानस्थ या
तर ध्यानस्थ या कवितेत
भेदत चक्र अविनाशी हो कालता अमृतकुंभ
कवितेत भेदत चक्र अविनाशी हो कालता अमृतकुंभ
रंध्रयाचे करूनी ओठ
ही सुष्टी झेलते थेंब!
नैसर्गिक भाषा शैली, संवेदनशील मनाचा ठाव घेणारी जीवनाच्या विविध अनुभूतीना सामावून घेत नाजुक कोवळ्या अनुभवतुन वास्तववादी, उत्कट कुतूहलाणे जीवनाला सामोरी जाते.