Share

पुस्तकाचे नाव : नटसम्राट
लेखक : वि.वा.शिरवाडकर
Book Reviewed by: पाटोळे जगदीश नरहरी
वर्ग : S.Y.B.C.S.
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik

काल संध्याकाळी नटसम्राट हा एक अत्यंत उत्तम चित्रपट मी पाहिला! मला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा माझा मित्र शामसुंदर याचे खास आभार! शामला मराठी संस्कृतीची उत्तम जाण आहे आणि मराठी संस्कृतीच्या जोपासण्यासाठी तो आपल्या परीने शक्य तितके प्रयत्न करत असतो. ह्या चित्रपटाचे विश्लेषण करण्यामागे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे गणपत आप्पा बेलवलकर यांच्या व्यक्तिरेखेचे आणि या चित्रपटातील मांडल्या गेलेल्या कथेचे विश्लेषण आणि दुसरा मार्ग म्हणजे या नाटकातील / चित्रपटातील कथेतून आपणास कोणता सामाजिक बोध घेता येईल याविषयीचे विश्लेषण! मी इथे दुसरा मार्ग स्वीकारतो आहे. पुढे कधी या नाटकाच्या मूळ संहितेचे सखोल वाचन केले तर पहिला मार्ग स्वीकारण्याचा मी प्रयत्न करीन.
आप्पा बेलवलकर नाटक या व्यवसायातून व्यवस्थित अर्थाजन करून व्यवसायिक जीवनाच्या एका टप्प्यावर निवृत्ती चा निर्णय घेतात. हा निर्णय घेताना आपण अंतर्मनाने समोर प्रेक्षकांना पाहू शकणाऱ्या दिग्गजांचे समाधान आता करू शकत नाही किंवा त्यांना अभिनयाच्या नवीन खोलीपर्यंत पोहोचवू शकत नाही म्हणून हा निर्णय अशी भावना असते.
आपलं राहतं घर मुलाच्या नावे आणि आर्थिक गुंतवणूक मुलीच्या नावे करून त्या आर्थिक जबाबदारीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या सुरळीत चाललेल्या संसारात हळूहळू छोट्या मोठ्या कुरकुरीवरून सुरुवात होते. आपल्या नातीला मायेचा लळा लावणाऱ्या आप्पांची आपल्याला मूळ स्वभावाला, सवयींना बदलत्या काळानुसार नवीन वळण लावण्याची तयारी नसते. तोंडी येणारे अपशब्द, दारूचे व्यसन, नातीला स्नेहसंमेलनात लावणी करायला सांगणे, या प्रकारांनी मुलगा आणि सून आप्पांवर नाराज होत असतात. हि काही वेळ आप्पांच्या घरातील कहाणी नाही. ही आपल्या समाजाची प्रतिनिधी कहाणी म्हणता येईल. दोन पिढ्या एका घरात नांदत असतात. एका पिढीची व्यावसायिक जीवन संपून गेलेलं असतं आणि ते आता निवृत्तीचे जीवन जगत असतात. त्यामुळे जीवनात काहीसा मोकळेपणा आलेला असतो. प्रत्येक गोष्ट अगदी गांभीर्याने घ्यायला नको असा काहीसा दृष्टिकोन विकसित झालेला असतो. या उलट दुसरी पिढी व्यावसायिक जीवनात सक्रिय असते तिथे अनुभवायला लागणार आहे हो, नोनसेंस दृष्टिकोन घरी सुद्धा बऱ्याचदा प्रमाणात आणण्याची त्यांची मनोवृत्ती असते. खास करून घरातील सून आपल्या नवीन पिढीला बाह्य जगासाठी सक्षम बनवण्यासाठी झटत असते आणि त्यामुळे जुन्या पिढीने दिलेली काहीशी वेगळ्या पिढीतील शिकवणूक तिला खटकत असते. मुद्दा सामंजस्याचा आहे. आजोबा-आजी घरात नातवंडाना भावनिक सुरक्षिततेची जाणीव करून देत असतात. जुन्या काळातील मूल्यांची कळत नकळत शिकवण देत असतात पण त्यातील काही गोष्टी नवीन काळाला अनुसरून नसतात.
एक निरीक्षणास आलं म्हणून मांडतो! बरीच माणसं आपल्या माणसांवर प्रेम किंवा द्वेष अगदी टोकाचे करतात. पण काळ बदलत चालला आहे. आपापल्या भावनिक संतुलन गाठीत या दोन भावनांमधील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. या चित्रपटामध्ये घरातील माणसांचे संवाद, वादविवाद राहणीमान, याविषयी गोष्टींची मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे.

Recommended Posts

उपरा

Dr.Subhash Ahire
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dr.Subhash Ahire
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More