उत्तरा, जानकी, सुमित्रा, अरविंद, सुब्बाराव हे पाच अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी I.I.Sc. बंगरुळू येथे उच्च शिक्षणासाठी एकत्र येतात. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, पण हळूहळू त्यांची घट्ट मैत्री होते. 1998 सालामध्ये या कादंबरीची सुरुवात होते. प्रत्येकाचे कुटुंबातील नाते संबंध, करिअरची स्वप्ने, जिद्द, चिकाटी याचा प्रवास लेखिका सुधा मूर्ती अत्यंत ओघवत्या व प्रभावी शैलीत आपल्यासमोर मांडतात. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगळे होताना पाचही जण शपथ घेतात की आजपासून बरोबर पंचवीस वर्षांनंतर सर्वानी याच I.I.Sc. बंगरुळू संस्थेत पुन्हा भेटायचे. प्रत्येकजण आपल्या स्वप्नामागे धावत वेगवेगळ्या दिशेने जातात. त्यांची स्वप्नं, त्यांना आलेले वास्तवाचे अनुभव याचा कालपट लेखिकेने या पंचवीस वर्षामध्ये मांडला आहे. लेखिकेने अत्यंत सुंदर आणि सुलभ भाषेमध्ये कादंबरी वाचकांसमोर ठेवली आहे. . पंचवीस वर्षांनंतर ते पुन्हा I.I.Sc. बंगरुळू येथे भेटतात. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो का ? याचे उत्तर कादंबरी वाचून मिळविणे योग्य !
Related Posts
ShareSupriya S. Jadhav JKRC, Savitribai Phule Pune University “The Monk Who Sold His Ferrari” is more than just a self-help...
Share“The Psychology of Money is a self-help book written by Morgan Housel. It is a short book of around 250...
Share(Review By Aarya Joshi-SYBHMCT Student -MAHARASHTRA STATE INSTITUTE OF HOTEL MANAGEMENT AND CATERING TECHNOLOGY AND RESEARCH SOCIETY, PUNE) Aishwarya, at...
