Share

1) अर्जुन विषादयोग-धर्मासाठी युद्ध करण्याची वेळ जेव्हा अर्जुनावर आली तेव्हा युद्ध कुरुक्षेत्रावर आपल्या परिवारातील सदस्य व गुरुजन समोर बघून अर्जुनाच्या हातातील धनुष्य मागे खचते घेऊ लागला त्यावेळी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी त्याला उपदेश करत सांगितले की, तू धर्माच्या बाजूने लढण्यासाठी या कुरुक्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आहे तू एक क्षत्रिय आहेस तुझा धर्म तू पाळणे गरजेचे आहे तुझा धनुष्य उचल आणि युद्ध कर पार्थ असे स्पष्ट श्रीकृष्णांनी अर्जुनाला ठामपणे तयार केले

2) सांख्ययोग-या योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे कर्तव्य समजावून सांगतात आणि मीच परमात्मा परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे अशी जाणीव करून देतात यामध्ये श्रीकृष्ण विश्वरूपाचे दर्शन अर्जुनाला घडवतात अर्जुनाला सांगतात की तू माझा शिष्य हो या भौतिक जगामध्ये आत्मा आणि परमात्म्याचे मोल तू समजून मला शरण जा.

3) कर्मयोग – या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते कार्य सोपवण्यात आले आहे या संसाराच्या मोहात बंधनात अडकून न पडता आपले कर्म करून कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि मुक्ती प्राप्त करून परमात्म्यामध्ये लीन होण्यास सांगितले आहे

4) ज्ञान कर्म संन्यास योग – या भौतिक जगामध्ये कोणतीही आशा न ठेवता आपली कर्म निरंतर आणि सातत्याने करणे तसेच आत्मा परमात्म्याचे संबंध जाणून घेणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार करणे याबद्दल श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे.

5) कर्म संन्यास योग- मनुष्याने दिव्यरूपी ज्ञानाची प्रचिती करून घेणे विरक्ती आणि सक्ती तसेच मोह माया मत्सर वासना क्रोध यांपासून दूर राहून चांगली कर्म करत राहणे असा उपदेश श्रीकृष्णांनी केला आहे.

6) ध्यान योग- या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात की आपण एक आत्मा आहोत आणि हे शरीर नश्वर आहे तर इंद्रियांच्या सभोवतात न जाता मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित कसे करावे याबद्दल परमेश्वराने रथावर स्वार असलेल्या मनुष्याचे व अश्वाचे उदाहरण देऊन अर्जुनाच्या प्रश्नाचे निरसन केले.

7) ज्ञान विज्ञान योग- मीच परम सत्य आहे हे भौतिक जग माझ्या कालचक्राच्या अधीन आहे सर्व माझ्यापर्यंतच येऊन थांबतात सर्व प्रार्थना माझ्यापर्यंतच पोहोचतात.

8) अक्षर ब्रह्म योग- एका आत्म्याने परमात्म्याचे निरंतर स्मरण करत राहणे तसेच परमधाम प्राप्त करणे हे भौतिक जगापासून आत्म्याला अलिप्त करते.

9) राजविद्या राजगुह्य योग- भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आणि परम आराध्य आहेत भक्तीच्या माध्यमातून जीवात्म्याचा त्यांच्याशी शाश्वत संबंध असतो शुद्ध भक्ती पुन्हा जागृत केल्याने मनुष्य श्रीकृष्णाचे वैकुंठ लोकांतील परम धाम परत प्राप्त करू शकतो असा उपदेश या योगात केला आहे.

10) विभूती योग- भौतिक किंवा आध्यात्मिक जगतांमध्ये बळ सौंदर्य वैभव किंवा उदात्तपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना म्हणजे श्रीकृष्णांच्या दैवी शक्ती होत्या किंवा ऐश्वर्याचे एका अंशाने प्रकटीकरण होते.

11) विश्वरूपदर्शन योग- भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात आणि विराट रूप दाखवतात ते स्वतः परमेश्वर असल्याचे सिद्ध करून दाखवतात.

12) भक्ती योग- भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध प्रेम प्राप्त करण्याकरिता भक्तीयोग हे सर्वात सुलभ किंवा श्रेष्ठ साधन आहे या पथाचे अनुसरण करणाऱ्यांमध्ये दिव्य गुण उत्पन्न होतात.

13) क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग- ज्या मनुष्याला शरीर आत्मा आणि या दोघांच्याही पलीकडे स्थित असलेला परमात्मा यांच्यातील भेद समजतो तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो.

14) गुणत्रयविभागयोग- सर्व देहधारी जीव सत्व रज तम या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या नियंत्रणाखाली असतात यांविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात.

15) पुरुषोत्तमयोग- स्वतःला भौतिक जगताच्या पाशातून मुक्त करणे आणि श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणे हे वैदिक ज्ञानाचे परम उद्दिष्ट आहे.

16) दैवासूरसंपद् विभाग योग- शास्त्रांचे नियम उल्लंघून मनाप्रमाणे स्वैर जीवन जगणारे आणि काय असुरी गुण असणारे लोक नीच योनीत जन्म घेतात आणि संसारामध्ये अधिकाधिक बांधले जातात.

17) श्रद्धात्रयविभाग योग- भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकारच्या श्रद्धा असतात रजोगुणी किंवा तमोगुणी श्रद्धा बाळगणाऱ्या पुरुषांना क्षणभंगुर फळे प्राप्त होतात.

18) मोक्षसंन्यास योग- वैराग्य आणि मानवी चेतना किंवा कर्म यांवर प्रकृतीच्या तीन गुणांचा परिणाम यांविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात शरणागतीचा हा सर्वोच्च मार्ग मनुष्यास सर्व पापांतून मुक्त करून पूर्ण ज्ञान करतो आणि श्रीकृष्णांच्या नित्य दिव्य धामात प्रवेश मिळवून देतो.

मी काय शिकले?
या भौतिक जगामध्ये जगताना धर्म न्याय निती यांचे मोल मी जाणले आपली बाजू जर सत्त्याची असेल तर आपल्या कार्यामध्ये परमेश्वरही आपली साथ देतात चांगले कर्म करीत राहणे आणि फळाची अपेक्षा न ठेवता भौतिक आ सक्ती पासून मनावर नियंत्रण कसे ठेवणे हे भागवत गीतेच्या माध्यमातून शिकायला भेटते .

गीता का वाचावी?
जीवनाचा दृष्टिकोन बदलता येईल तसेच यशाच्या वाटचालीवर चालताना कोणती नीतिमत्ता अवलंबून वाटचाल करावी हे यातून शिकायला भेटते आपली कर्तव्य जाणून घेण्यासाठी तसेच या पृथ्वीवर आपण का आलो आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भगवद्गीता वाचावी .

Recommended Posts

उपरा

Yashodip Dhumal
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Yashodip Dhumal
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More