माझ्या आयुष्याची पानं
मीरा चड्डा बोरवणकर
या कथासंग्रहाची लेखिका मीरा चड्डा बोरवणकर असून याची मूळ प्रत इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचा अनुवाद सायली गोडसे यांनी मराठीत केला आहे. या पुस्तकातील कंटेंट आणि त्याचे स्वरूप खरोखरच छान आहे. मुली आणि गृहिणीने वाचले पाहिजे कारण ते तुमचे छोटे निर्णय तुमचे जीवन कसे चांगले बनवू शकतात हे सांगितले आहे. या पुस्तकातील दहाव्या प्रकरणात यातून शिकण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी प्रत्येक मुलीने आपले स्वतःचे करिअर निवडताना खूप विचारपूर्वक निवडले पाहिजे. करिअर निवडताना वडीलधाऱ्या माणसाकडून किंवा आपल्या शिक्षकाकडून मार्गदर्शन जरूर घ्यावं पण शेवटचा निर्णय आपण स्वतःच घ्यावा. हे पुस्तक सर्व मुलींना वाचनीय तर आहेच परंतु स्वतःची निर्णय क्षमते विषयी प्रकाश टाकणारे आहे.
धन्यवाद मीरा मॅडम!!