Share

Review by Principal Prof. Dr. Sangeeta Jagtap, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-27
and Member of Management Council, SPPU, Pune

संदीप श्रोत्री यांनी खूप सुंदर रित्या लिहिलेल्या ‘मार्क इंग्लिस‘ या पुस्तकामध्ये मार्क इंग्लिस या गिर्यारोहकाच्या संघर्षमय व जिद्दीची कहाणी वर्णन केली आहे. हे दोन्ही पाय नसलेला जगातील पहिला आणि अद्यापपर्यंत एकमेव व्यक्ती आहे. मार्कने त्याचे दोन्ही पाय १९८२ साली न्यूझीलंडच्या ‘माऊंट कुक’ या शिखरावर चढताना हिमदंशामुळे गमावले. त्यांनी तब्बल २४ वर्षानंतर फक्त ध्येपूर्तीसाठी जिद्दीने दोन कृत्रिम पाय लावून पुन्हा माऊंट कूकच नव्हे तर एव्हरेस्टवर पण चढाई केली.
या जिद्दीचा कहर म्हणजे त्याने केवळ याच क्षेत्रात बाजी मारली नाही तर कृत्रिम पाय बसावल्यानंतर सायकलिंग शिकून २००० सालच्या परालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच त्याने बर्फावरील घसरण्याचे स्कीइंग चे वेड मनात ठेवून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले. एवढ्या यशावर न थांबता त्यांनी ‘माँटना’ या वाईन बनवणाऱ्या कंपनीत काम करत असताना युरोपमध्ये भरलेल्या वाईन प्रदर्शनामध्ये त्याच्या वाईन ला सर्वात पहिले बक्षीस मिळाले. अशा या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वप्नपूर्ती साठी सातत्याने पाठपुरावा करत यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या यशस्वी गिर्यारोहकाची ही प्रेरणादायी व साहसकथा सर्वांनी वाचलीच पाहिजे.

Related Posts

The bread winner

Dr. Vitthal Naikwadi
Share*द ब्रेड विनर* *लेखिका* : डेबोरा एखलस *अनुिाद* : अप􀅵ा िे􀅵कर *मुख्य पात्र* : परिाना *लेखिकेचा पररचय*: डेबोरा एखलस (ज􀍆...
Read More