Share

Book Review: Khare Soundarya Tatyasaheb, Final Year B Pharmacy Divine College of Pharmacy Satana
‘मी एक स्वप्न पाहिल’ हे पुस्तक ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक नसून तर हे पुस्तक स्वअनुभवातून लिहिलेले आहे. येथे लेखक आपल्या खडतर परिस्थितीतून कसे पुढे आले, याचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
‘मी एक स्वप्न पाहिल!’ हे सदर पुस्तक निवडण्यामागचे कारण हेच की. लेखक यांच्या आत्मकथनपर व अतिशय शून्य अशा आयुष्यातून् व आदिवासी कटुंबातून कशे पुढे आले, व तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा अतिशय खडतर परिस्थितितून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले, याचे वर्णन दिलेले आहे लेखकांविषयी मला वैयाक्तक खूप आदर आहे. कारण एका आदिवासी समाजाचा मुलगा कुठलेही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना स्वकर्तृत्वाने अधिकारी होतो. हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
सदर लेखक हे अतिशय गरिब कुटुंबातून पुढे आलेले आहे त्यांनी ‘मी एक स्वप्न पाहिल!’ या पुस्तकातून आपल्या जीवनाचा खडतर प्रवास नमूद केला आहे. प्रामाणिकना व कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आणि विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितिवर मात करून उत्तुंग भरारी घेतो लेखकांचा शालेय व महाविद्यालयीन जीवन व केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवासु खरतर एखाद्या चित्रपटासारखाच आहे.
डॉ. राजेंद्र भारुड हे आईच्या पोटातच असताना त्यांचे पितृछत्र हरपले धुळे जिल्हयातील सामोडे गावच्या आदिवासी एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरान कर्ता पुरुष कोणीही नाही. फक्त दोन स्त्रिया त्यांची आई कमलाबाई, त्याची मावशी (मोठमाय), एक भाऊ दीपक, एक बहीण (द्रोपदी) लेखकाच्या बालपणाविषयी सांगायचे म्हणजे, लेखकांच्या वडिलाचे निधन हे लेखक जेव्हा त्यांच्या आईच्या गर्भान होते तेव्हा मिरगी या आजारामुळे झाले. तेव्हा आठवड्याभरानच लेखकाची मावशी त्यांचा बहीण व माऊ यांना आपल्या घरी घेऊन गेली पण त्यांची आई मात्र त्या भकास झोपडीत एकटीच शोक करन बसलेली असायची. याच परिस्थितितून त्यांची आई निघत नाही, तोवर लेखकांच्या वडिलाकडच्या लोकानी आईवर आणखी एक जबरदस्त आग्रह केला, तो म्हणजेच गर्भपाताचा! पण पुन्हा मावशी खबीरपणे आईच्या बाजूने उभी राहिली तिने आईचा गर्भपात होऊ देणार नाही, तेव्हा कळते की. लेखकाच्या आई मनाने श्रीमंत होत्या, सलाम त्या माऊलीला किती ठामपणे लेखकाच्या मावशीने त्या असवेदनशील लोकांना सांगितले लेखकाच्या जन्मानंतर काही काळातच लेखकाच्या आईने दारु काढण्याच काम सुरु केले.
दारु काढण्याच काम हा आदिवासीयांचा पारंपारिक व्यवसाय होय. जेव्हा लेखक जरा मोठे झाले, तेव्हा त्याच्या आईवरच्या जबाबदाऱ्याही वाढल्या, जेव्हा त्याच्या आई दारु काढण्याच काम करुन ती विकत असे, तेव्हा तिथे येणारे ग्राहक जास्त असल्यामुळे त्या सकाळीच लवकर उठून दारु पाडायला जात असे, व नंतर लेखकांची तयारी करून त्यांना शाळेत पाठवत असे एका संध्याकाळची गोष्ट लेखक सागतात की, ते जेव्हा अभ्यास करत असे, तेव्हा तेथे येणारे ग्राहक त्यांना नको ते काम सांगत व त्याना आक्षेपार्ह बोलत. परंतु त्यांची आई त्यास विरोध करायच्या त्यावेळेस तिथे येणारे ग्राहक टिंगलटवाळी करायचे की, हा तुझा मुलगा डॉक्टर, कलेक्टर होणार आहे का? त्यावेळेस त्यांच्या आईना खूप वाईट वाटत असे, लेखकाच्या आई त्या लोकाना ठामपणे सांगायच्या की, माझाही मुलगा एक दिवस डॉक्टर, कलेक्टर होईल! माझ्यामते तरी अश्या लोकांमुळेच जे की आपला अपमान करतात व आपल्याला मागे खेचतात त्यांच्यामुळे जीवनात काहीतरी करण्याचे बळ भेटते, जेवढी टिका तेवढे यश!

Recommended Posts

The Undying Light

Yashwant Chaudhari
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Yashwant Chaudhari
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More