नाना मी साहेब झालो हे पुस्तक उपेक्षित सालगड्याच मुलगा ते आय आर एस अधिकारी यांचा
एक जगा वेगळा जीव घेणा संघर्ष आहे . सदर पुस्तकामध्ये वडील आणि आई सालगड्याचे काम
करत असतात . तसेच वडील हे दिव्यांग असूनही गरिबी कायम पाट्यावर पुंजलेली दिसत आहे .
लेखकाचे पहिलीचे शिक्षण ते आय एस. आर अधिकारी पदापर्यंत घोडदौंड ही गरीब व ग्रामीण
भागातील विद्यार्थांना प्रेरणा देणारी आहे . हे पुस्तक लिहिताना लेखकाचा मते अधिकारी
होण्याच्या अगोदरचे जीवन मागे वळून पाहताना खूप धाक्कादायक वाटत आहे . पण या
अनुभवाने प्रथम जगायला आणि त्यानंतर टिकून राहायला शिकवले . अपेक्षा, दारिद्र ,उपासमार
,अपंगत्व नैसर्गिक आपत्ती, संकटे या विविध बाबी लिहताना एका हाताने लिहित असताना
दुसऱ्या हाताने अनेकवेळा डोळे पुसावे लाग होते . कधी – कधी लेखकाचे आश्रू थांबत
नसल्याने लिहिणे थांबवून शांत बसत आले . सदर पुस्तकात त्यांना जो जीवनात अनुभव
आला असा अनुभव वर्यालाही येऊ नये . असे त्यांना वाटते . सदर पुस्तक लिहिताना लेखकाचे
अपंग व्यक्तीच्या जीवन संघर्ष आणि विपरित्त परिस्तिथीत शिक्षण ,एमपी.,यूपीएससी यांची
केलेली तयारी या बाबीवर लक्ष दिलेले आहे . दररोज जीवन जगताना असताना सर्वसाधारण
लोकांना निश्चित विचित्र अनुभव येतात पण अपंग व्यक्तीला मात्र दर क्षणाला असा अनुभव येत
असतो . त्याग ज्ञानी जगतीचे लेबल लावता येणार नाही . अपंग माणसाकडे पाहण्याचा
दुष्टीकोन आता बदलत असला तरी आता सरकारचे जावई या नव्या संधभाचे अंगाने घेतला
जाऊ लागल्याचे या पुस्तकात दिसत आहे . सदरचे पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी करू
शकतो ,आपण घडू शकतो .यासाठी निश्चितच प्रेरणा मिळाली आहे . सदरच्या पुस्तकात जर
आपल्याकडे इच्छा शक्ती कष्ठ करण्याची तयारी ,चिकाटी जर असेल तर ते आपापल्या
यशापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते . सदर लेखकाचे घरी मी स्वत जाऊन
आलो असून त्यांचे आई वडील व लेखक यांची घरची परीतिथी मी स्वताही पहिली असून
पुस्तकांचे केलेले वर्णन बरोबर आहे .