पुस्तकाचे नाव: मृत्युंजय
लेखक : शिवाजी सावंत
नाव: गव्हाणे सलोनी दौलत
CLASS: T.Y.B.A.
College: GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
पुस्तकाचा मुखपृष्ठ अतिशय सुबक असून दानवीर तसेच धैर्यविर कर्ण स्वर्गीय दिनानाथ दयाल यांनी साकारले आहे. मलपृष्ठावर स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या मूर्तीचा फोटो देखील आहे. ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचं नाव करण्याच्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे, हे जाणवतं. मृत्यूच्या दारात सुद्धा जाने जीवनाचा धुंद विजय अनुभवला म्हणूनच त्याचे नाव मृत्युंजय. मृत्यूवर विजय मिळवणारा. शिवाजी सावंत लिखित कर्णाची अमरगाथा मृत्युंजय ५५ वर्षाच्या दीर्घकाळानंतर आजही मराठी व सर्वच पुस्तक प्रेमी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. मृत्युंजय ही कादंबरी महाभारतातील पात्र महापराक्रमी दानशूर महारथीकर्णाला समर्पित आहे. ही कादंबरी सन १९६७ साली प्रकाशित झाली. या कादंबरीमध्ये कर्ण समवेत अर्जुन पाच पात्र दिसून येतात. कर्ण, राजमाता कुंतीदेवी, वृषाली, दुर्योधन, भगवान श्रीकृष्ण. दानशूरपणा कशाला म्हणतात, संयम कसा असावा, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी, हे सर्व शिकवणारी ही कादंबरी आहे. कर्ण त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर तो अमर झाला. त्यांनी स्वतःला सुतपुत्र मांनले जेव्हा त्याला त्याची ओळख कळली तेव्हाही त्यांनी आपली ओळख सांगितली नाही. ज्याने स्वतःच्या गुरुचा शाप ही वरदान समजून घेतला.
या कादंबरीला वाचताना जगू आपण प्रेतायुगात वावरत आहोत असा भास होऊ लागतो. मृत्युंजय कादंबरी हाती घेतल्यावर कर्णाचे जीवन नावाने मनात उलगडू लागते. साक्षात इंद्रदेवाला दान देणाऱ्या त्या सूर्यपुत्रासारखा दानवीर या धरतीवर राजवीर झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही. कर्ण ज्याने स्वतःच्या शब्दासाठी आपलं अस्तित्व दान केलं आपले प्रण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले. स्वतःचे वचन पूर्ण केले.
कर्णाने दिग्विजया दरम्यान जमवलेली सर्व संपत्ती दान म्हणून देण्याचा सपाटा सुरू केला होता. यादरम्यान एक रात्री साक्षात सूर्यदेव त्याच्या स्वप्नात आले व त्यांनी सांगितले उद्या इंद्र याचक म्हणून तुझ्या दारात येणार आहे! धनसंपत्ती, वस्त्र, गायी काही न मागता तुझी कवच कुंडली मागणार आहे ते तू दान करू नको हे दान नाही दास्य ठरेल असे सांगितले. पण कर्णाने सुर्याला वंदन करून सांगितले जर इंद्र याचक म्हणून माझ्या दारात येणार असेल तर त्यांना मी आवश्य दान देईल. कर्णाच्या या दानशूरतेने संतुष्ट आणि प्रभावीत झाले त्या इंद्रदेवाने त्याला एक शत्रूला वधु शकणारे वैजयंती अस्त्र भेट म्हणून दिले.
या कादंबरीला पाहता क्षणी नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखातून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म, जगाच्या भीतीने कोणताही घेतलेला कठोर निर्णय, गुरु द्रोणचार्य आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान त्यातूनच दुर्योधना सोबत जन्मास आलेले मित्र प्रेम, द्रोपदी वस्त्रहरण, कुरुक्षेत्रातील युद्ध, या सर्वच गोष्टी प्रत्येकास माहित आहेतच. पण या प्रत्येक गोष्टीत काही बारीक-सारीक अशी कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. त्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षांनुवर्ष आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत पण ही अजूनही अनुत्तरीत आहेत उदाहरणार्थ कुंतीला पुत्रप्राप्ती नक्की झाली कशी? सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोन म्हणून असलेल्या राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती? या प्रश्नाची उत्तरे या कादंबरीत भेटतात. द्रोपदी वस्त्रहरणात कर्णाने द्रौपदीचे रक्षण का केले नाही? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारण्यात कर्ण का सामील झाला? खरेच तो अधर्मी होता का? पण असे होते, तर मग श्रीकृष्णविरुद्ध पक्षात असताना त्यांनी सुतपुत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसे जसे आपण एक एक पान वाचत जाऊ तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.
आजच्या तरुण व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने अवश्य वाचावी अशी ही मराठी साहित्यातील “शिवाजी सावंत” यांनी लिहिलेली अमर मृत्युंजय कादंबरी आहे.