शिवाजी सावंत लिखित कादंबरी यात लेखक श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रावर विस्तृत वर्णन करीत म्हणतात की ……
होय मीच बोलतोय जो महाभारतात ज्याने शत्र न उचलण्याचे प्रण घेतले होते. होय मी तोच जो अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून धर्माची राखण करत सजला होता. ज्याच्यात्याच्या म्हणण्यानुसार आणि मानण्यानुसार मला देव पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण तसेच सारथी व मित्र मानले पण माझी कथा आज मला स्वत:ला सांगायची आहे……
कोण आहे मी…..!
गवळणींचे दही, दूध, तूप, लोणी, चोरून खाणारा. यशोदेचा लाडका, देवकी चा पुत्र आणि द्वारकेचा द्वारकाधीश…..
गोकुळात झालेल्या माझ्या नामाकरणापासून तर द्वारकेपर्यंत सर्व घटना यात विस्तृत केलेली आहे. नामकरणाच्या वेळी गर्ग ऋषींनी सांगितले होते की न्यायासाठी आणि धर्म रक्षणासाठी या मुलाचा जन्म झाला आहे. सगळ्यांना मोहित करणारा मनमोहन कृष्ण नाव मला देण्यात आले. माझे सखा मित्र म्हणजे उद्धव, भद्रसेन, दाऊ आणि सुदामा यांच्या सोबत गाई चरण्यासाठी गेल्यावर केलेल्या क्रिडा आणि ते यमुनेच नितळ पाणी सगळ काही मला मोहून घेणार होत. सांदिपनी ऋषींच्या आश्रमातील काही अनुभव मला अजूनही आठवतात. गोकुळात अस एकही घर नव्हत जिथे आम्ही चोरून दही, दूध खाल्ल नाही.
इंद्र उत्सव करण्याची प्रथा आधीपासून चालत आली होती पण मला ते मान्य नव्हते मी ठामपणे सांगितले व त्या उत्तरावर फक्त बलरामाने मला साथ दिली. माझे विचार नंदबाबांना पटल्यावर त्यांनी ही माझ्या बाबतीत समर्थन केले. इंद्र उत्सव करण्या ऐवजी गोवर्धन पूजा करण्यास तयार झाले पण इंद्र देव क्रोधीत झाल्याने जे काही संकट आले ते मी फक्त एका करंगळीवर निभाऊन नेले. माझ्या प्रिय राधिके सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला मोहाच्या धुंदीत टाकणारा होता. मधुरा नावाच्या नगरीच मथुरा नागरी होई पर्यंतचा सगळा प्रवास मी अनुभवला.पांडवांना राजगादी मिळऊन दिली. कुरुक्षेत्रामध्ये जरी युद्ध माणसांमध्ये होत होते असे दिसले तरीही ते सर्व अंश माझेच होते. त्यावेळी मला वेदना होत होत्या. युद्धातले तीर मला छेदून पार पडत आहेत असे मला वाटत होते. १०० कौरवांचा वध होत आहे असे दिसले तरीही माझेच अंश माझ्यातच विलीन होत होते. अभिमन्यूला व कर्णाला होत असलेल्या वेदना मला जानवत होत्या..
रुक्मिणी _
रुक्मिणी जिला स्वयंवर करण्याआधीच कृष्णा सोबतची साथ लाभली. रुक्मिणी साठी तर स्वतः कृष्ण युद्ध करण्यासाठी तयार झाले होते. प्रद्यूनच्या जन्माच्या वेळी सगळ्या घटना मला विस्तृत आठवतात की कसे प्रद्यूनचे अपहरण झाले होते. रुक्मिणी आणि कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याला दुसरेच कुणी युद्धनीती शिकवत होते त्याची कुणीतरी दुसरीच आईची भूमिका बजावत होते जांभवंत राजाची सुपुत्रि जांभीवंती हिचा विवाह श्रीकृष्णांशी झाल्याने मी जरा गडबडले पण होते इतकी सुंदरता पाहून कुणीही मोहित व्हावं अशी तिची छबी होती आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी व सीमंतक मनी मिळवण्यासाठी एका बापाच्या वचनाला बद्ध झालेले कृष्ण बघून मी थक्क झाले होते.
दारूक _
असे कित्येक युद्ध असतील जे मी स्वामीं सोबत म्हणजेच श्रीकृष्णांसोबत रणांगणावर बघितले होते मी एक सारथी पहिली भेट कंसाच्या वधा नंतर मथुरेत झाली होती तसे तर स्वतः परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून होते पण मी या नारायणाचा सारथी म्हणून रथावर स्वार होत होतो .
द्रौपदी _
द्रौपदी मीच जिने कृष्णाच्या जखमेवर बांधलेल्या एका कपड्याची किंमत कृष्णाने वस्त्रहरणाच्या वेळी परत केली. सुधामा सोबत गरीब श्रीमंतीचा भेदभाव न करता क्षनोक्षणी मी मदत केली व मैत्री टिकवली. कृष्णाला सर्व गोष्टी आधीच माहित असतानी सुद्धा वेळेच्या व कालचक्राच्या गतीमध्ये अडकून राहून सर्व धर्म व कर्तव्य पार पाडली.
अर्जुन _
पाच पांडवांमधला मी एक . याच पाच पांडवांसाठी श्रीकृष्णांनी आमची म्हणजेच धर्मासाठी बाजू राखून धरली होती. धर्मासाठी त्यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिचा विवाह माझ्याशी करून दिला होता . मी सुभद्रेचा अपहरण करू शकत नव्हतो म्हणून श्रीकृष्णांनी मला एक युक्ती सांगितली होती की तू जरी सुभद्रेचा अपहरण करू शकला नाहीस तरीही मात्र सुभद्रा तुझं अपहरण करून शकते त्यानंतर तुला नारायणी सेने सोबत युद्ध करावे लागणार नाही तू फक्त निशस्त्र हो ,अशा खूप काही आठवणी तसेच खूप गंभीर रहस्यही माझ्यासमोर उघडले गेले . काही रहस्य तर महाभारताच्या युद्धात मला जाणवले की श्रीकृष्ण कोण आहेत सर्व गीतेचे ज्ञान मला श्रीकृष्णांनी या युद्धाच्या 18 दिवसांमध्ये दिले होते.
सात्यकी _
मी सत्य की यादवांच्या अठरा कुळातील एक कुळातला , शेवटच्या क्रमावर का असेना पण सखा मात्र नक्कीच होतो.
उद्धव_
तसे बघायला गेले तर मी श्रीकृष्णांचा प्रिय सखा होतो म्हणतात ना की एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपण त्याच प्रमाणे वागायला सुरुवात करतो तसेच मी ही काही श्रीकृष्णांप्रमाणेच वागायचा प्रयत्न करत असे.
वृक्षाखाली जेव्हा कृष्णाच्या पायाला बाण लागला त्यावेळी सुद्धा तिथे कोणीही नव्हते . त्यानंतर घटना जेव्हा बाकीच्यांना कळली तेव्हा मला तुझ्याबद्दल खूप मनातून काहीतरी विचारावस वाटतय प्रद्युम्न तुझा मुलगा असून सुद्धा त्याला तुझ्याबद्दल काहीही पाठपुरावा घेता आला नाही , तसेच रुक्मिणी वहिनी सोडता बाकीच्या कुणालाही तुझ्याबद्दल काहीच कधीही कळले नाही , तू स्वतः अर्जुनाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या तरीही लवकर तुझ्याबद्दल समजण्यासाठी काही गोष्टी सीमित राहिल्या . माझं मन अक्रांत करत होतं . हृदय दुःखी होतं . माझा दादा श्रीकृष्ण युगंधरा खरोखर तू कोण होतास असं मला तुला विचारावं असं वाटतंय ……