Share

प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची वावटळ ही ग्रामीण कादंबरी आहे. ही कादंबरी 1985 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. व्यंकटेश माडगूळकर हे ग्रामीण साहित्याच्या प्रभावातील अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजातील लोक विशिष्ट जातीतील लोकांना कशाप्रकारे वागणूक देतात, द्वेष, अन्याय करतात याचे ग्रामीण भाषेतील बोलीत वास्तववादी चित्रण केलेले दिसून येते. वाढदिवसाच्या जगण्याच्या पद्धती संघर्ष करावा लागणार संघर्ष याचे लेखकाने या कादंबरीमध्ये प्रकाश टाकलेला दिसून येतो.
30 जानेवारी 1948 च्या सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी नथुराम विनायक गोडसे नामक एका ब्राह्मण युवकाने गांधीजींची गोळी घालून हत्या केली आणि देशाचे राजकारण, समाजकारण सगळे एका रात्रीत बदलून गेलं. या घटनेचे परिणाम शहर, गाव, खेडे या पुरते मर्यादित राहिले नाही तर दुर्लक्षित भागातील लोक सुद्धा या आगीत होरपळून निघाले. तेव्हाची जीवन व्यवस्था ढवळून निघालीच सोबत येणाऱ्या आगामी पिढ्या सुद्धा ह्या घटनेच्या शिकार झाल्या.
पुण्यात राहणारे तीन युवक गांधी हत्याच्या संध्याकाळनंतर त्यांच्या आयुष्यात आलेली वावटळ मांडणारी ही कादंबरी त्यांचा पुण्याहून गावाकडे झालेला प्रवास प्रवासात गावागावातून माणसाच्या आयुष्यात होणारे बदल आणि मग आपापल्या गावी पोहोचल्यावर त्यांची उध्वस्त झालेली घर, गाव याचे वर्णन पाहून जीवन अस्वस्थ होऊन जाते. विशिष्ट जातीद्वेष्टा समाज आज पण आहेच. त्याची पाळमुळ किती आधीपासून रुजलेली आहेत ते ही कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं. पण एक गोष्ट खूप नकळत जाणवली ती म्हणजे प्रत्येक समाज दुसऱ्या समाजावर किंवा स्वतःवर नकळत अन्याय हा करत असतोच आणि त्या सगळ्याची आपल्याला इतकी सवय झालीये की आपल्या ते लक्षात ही येत नाही.
लेखकाने शंकर, यशवंत आणि गोपू या युवकांची पात्रे वर्णन केले आहेत. पुण्यात झालेल्या जाळपोळीचे , लुटालूटीचे रसभरीत वर्णन जणू काही एखाद्या चित्रपट आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. पुणे शहरातून नांदवडी, चोपडी खेड्याकडे त्यांच्या गावी जाताना त्यांना करावी लागलेली कसरत, मनात प्रचंड भीती निर्माण झाली. प्रवास करताना गांधीजी मारलं म्हणून लोकांनी ब्राह्मणांची घरं जाळली चोहोबाजूंनी अशी लोक कुजबुज करीत तसे आमच्या घरची माणसं कुठं गेलीत.. मोटारीतून त्यांना उतरावे लागले, पायी पायी चालत जाताना समाजातील इतर लोकांची वागणूक, ब्राह्मणांची घरे जळून खाक झाली, त्यांच्या घरातील व्यक्तींचे काय झाले असावे आई वडील काय करत असतील याचे हुबेहूब वर्णन या कादंबरीतून केलेले दिसून येते.
आपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी आणि आपली मदत करणारी, आपल्याच गावातील ही माणसे आपली शत्रू होतील असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही जाणीव त्यांना आज पहिल्या प्रथमच होत होती हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्यांने ही मंडळी मुळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही. आता कशाचीही शाश्वती नाही केव्हा काही होईल याचा नेम नाही! एका वावटळीमुळे हे सर्व घडले होते…..
आलेल्या अनुभवातून ब्राह्मणांनी गाव सोडणं भाग पडले. इतर समाजातील लोक त्यांनाए आपले गाव सोडून जाऊ नका असे म्हणतात. परतू ते शहराकडे प्रस्थान होतात समाजामध्ये कोणतीही घटना घडल्यानंतर याचे परिणाम कितीतरी वर्षापर्यत राहून इतर समाजातील नुकसान किती मोठ्या प्रमाणात होऊ शकते याचे चित्र या कादंबरीतून केलेले आपणास दिसून येते.

Recommended Posts

The Undying Light

Dr. Amar Kulkarni
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Dr. Amar Kulkarni
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More