Book Reviewed by नेहा संजय बच्छाव (११ वी कला)
“शामची आई” हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्कारांचे प्रभावी चित्रण करते. साने गुरुजींच्या लेखणीतून आईच्या निस्मीम प्रेमाची त्यागाची आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहाणी उलगडते ‘कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते श्यामचे बालपण गरीब पण संस्कारक्षम कुटुंबात घडते. श्यामच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार योग्य मिळत नाही या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते.
ती कष्टाळू संयमी आणि त्यागशील स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दु:ख आणि त्रास सहन करूनही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक केवळ आईच्या ममतेची गोष्ट नाही तर तिच्या नैतिकता, समाजसेवा, आणि कर्तव्यपालनाचे ही उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्व शिकवते आणि त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्याला सत्य, अहिंसी आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. ती श्यामला नेहमी देवावर श्रद्धा देवून श्यामची आई त्यागाची शिकवण देते. पुस्तकात अनेक प्रसंगांमध्ये आईच्या कर्तुत्वाचा उल्लेख आहे. श्यामला शाळेत पाठवण्यासाठी ती कष्टाने पैसे साठवते आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते.
श्यामच्या आईचे ध्येय स्पष्ट असते की आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्ती बनवणे. आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्या विषयी अपार प्रेम निर्माण होते. ती श्यामच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्याला योग्य मार्गदर्शन करते आणि त्याला सदाचरणाचे धडे देत श्यामच्या आईने तिच्या आयुष्यात अनेक संकट सहन केले. पण तिच्या मुलांच्या शिक्षणात आणि विकासात तिने कधीच कमीपणा येऊ दिला नाही पुस्तकाची शेवट अत्यंत भावनिक आहे. श्यामची आई आजारी पडते आणि अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोठी पोकठी निर्माण होते. पण तिच्या शिकवणुकीने तो आपले जीवन सत्कारणी लावतो. आईच्या आठवणी त्याला नेहमीच प्रेरणा देतात.
“श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे चित्रण करते या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम, आदर, आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय समाजातील आईच्या भूमिकेचा गौरव करतात. गुरूजींनी तिला नवी ओळख दिली आहे. “श्यामची आई “हे पुस्तक केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नव्हे, तर नैतिक मूल्ये , संस्कार आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अमूल्य रण मानले जाते. हे पुस्तक सर्वानी नक्की वाचायला हवे.