श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवन चरित्रं वरील एक ऐतिहासिक कादंबरी आहे .रणजीत देसाई हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत . श्रीमानयोगी हे नाव जेवढं शांत वाटतंय त्या पेक्षा जास्त वादळी हे आपल्या शिवरायांच आयुष्य होत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत . ही कादंबरी महराजांचा जन्मापासून सुरू होते आणि पुढे ती कधीच थांबत नाही . ह्याच कारण खूप सोप्पं आहे , ज्या माणसाने आपल्याला जागायला शिकवलं त्याची कादंबरी कशी थांबू शकते. आपल्या महाराजांचा जीवन ह्या कादंबरी मुळे आपल्याला समजत . राजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी रक्ताच पाणी केलं . शून्यातून सुरू केलेल्या राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महराजांनी स्वराज्य मध्ये केली . घोड्यांचा टापाखाली गुलामगिरी उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजान माझं मानाचा मुजरा .
मला ह्या कादंबरी मधील खूप काही गोष्टी आवडल्या आहेत . राजांच आपल्या मावळयांबरोबर असलेलं नातं रणजीत देसाई ह्या कादंबरी मध्ये पुरे पुर मांडतात .