Share

ही एक हृदयस्पर्शी कथा असून ती संघर्ष, त्याग, आणि प्रेमाचे संवेदनशील दर्शन घडवते. एका गरीब पण मनाने श्रीमंत कुटुंबाची ही गोष्ट समाजाच्या विविध स्तरांतील वाचकांसाठी खूपच सुसंगत आहे. लेखकाने आपल्या साध्या, प्रवाही भाषेतून वाचकाला एका भावनिक प्रवासाला नेले आहे, ज्यामुळे ही कथा लक्षात राहणारी ठरते. या कथेत एका गरीब मुलाच्या शिक्षणाच्या प्रवासाचे वर्णन केले आहे, ज्यासाठी त्याची आई वडील प्रचंड कष्ट करतात. ही कथा त्या काळातील ग्रामीण भारतीय समाजातील कुटुंबव्यवस्थेचे उत्तम प्रतीक आहे.मुलाच्या मनात आईच्या कष्टांसाठी असलेली कृतज्ञता ही केंद्रस्थानी आहे, पण त्याचबरोबर कुटुंबाला उभारी देण्यासाठी मुलाने घेतलेले शिक्षण आणि संघर्ष या घटकांवरही लेखण जोर देते. आईच्या त्यागामुळेच या कुटुंबाचा भावनिक गाभा आकार घेतो. आई म्हणते, “तू शिक, मोठं हो, तू मला काहीही देऊ नकोस.” या एका वाक्याने तिच्या ममतेचा आणि त्यागाचा प्रत्यय येतो. वडील काम करून थकल्यावरही कधी तक्रार करत नाहीत आणि आईची जिद्द तर मुलाच्या प्रत्येक यशाची प्रेरणा बनते. कथेत आई-वडिलांनी कशा प्रकारे आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याग केलेला आहे, हे वाचून मनाला प्रेरणा मिळते. कथेतील आई मुलाच्या यशासाठी तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्याला समर्पित करते, त्यात ती स्वतःच्या गरजांचा कधी विचार करत नाही. लेखक सांगतो की आई-वडील आपल्याला केवळ “जगण्यासाठी” नाही, तर “चांगलं आयुष्य जगण्यासाठी” शिकवतात. मुलगा मोठा होऊन उच्च स्थानावर पोचतो आणि त्याने स्वतःच्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टांना दिलंय, हे वाचकांच्या हृदयाला भिडतं. कथा ग्रामीण भागातील असून ती भारतीय समाजातील नातेसंबंधांचं वास्तव उलगडते. विशेषतः मराठी वाचकांसाठी ही कथा एक आयना ठरते, कारण प्रत्येक कुटुंबात अशा त्यागमय नात्यांची छाया पाहायला मिळते. लेखकाने दाखवलं आहे की शिकलेला मुलगा आई-वडिलांच्या कष्टांची दाद देऊ शकतो, हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा पैलू आहे. लेखनशैली अतिशय सरळ, स्वाभाविक, आणि प्रभावी आहे. कोणत्याही गोंधळात टाकणाऱ्या किंवा उगीच लांबलेल्या वर्णनांशिवाय कथा पुढे सरकते. संवाद साधे असले तरीही वाचकाच्या मनाला खोलवर भिडणारे आहेत. लेखकाने कथेसाठी निवडलेली शैली ग्रामीण भागातील साध्या जगण्याला उत्तमपणे साजेशी आहे.
कथेतील आई आणि वडिलांचा संघर्ष हे केवळ त्यांचं काम नाही, तर कुटुंबासाठी केलेलं एक तपस्व्यसारखं योगदान आहे.
शिक्षण हीच गरीबीपासून सुटण्याची एकमेव वाट आहे, हा महत्त्वाचा संदेश लेखकाने सहजतेने दिला आहे.
एका ठिकाणी मुलगा विचारतो, “आईने स्वतःसाठी काही का घेतलं नाही?” आणि त्याच्या या विचारांमधून वाचक भावूक होतो. आईच्या त्यागामुळं यश संपादन होतं, हा शिकवण देणारा संदेश ठळकपणे समोर येतो.
कथेतील आईचे वर्णन एक अशी व्यक्तिरेखा म्हणून केले आहे, जिला आपण सशक्त नारी म्हणतो. ती केवळ त्याग करते नाही, तर ती तिच्या मुलाला कायम प्रेरित करते.
“काम काहीही असो, ते मनापासून केलं की त्याला प्रतिष्ठा मिळते,” हा विचार या कथेत अप्रत्यक्षपणे दिला आहे.ही कथा जीवनातील साधेपण, प्रेम, आणि त्यागाच्या मोलावर प्रकाश टाकते. लेखकाने अत्यंत साध्या भाषेत जीवनात पुढे जाण्यासाठी कुटुंबाचं किती महत्त्व आहे, हे सांगितलं आहे. वाचकाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं.

Recommended Posts

The Undying Light

Dr. Bhausaheb Shelke
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Dr. Bhausaheb Shelke
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More