स्मृतीगंध
गुणाबाई गाडेकर
मला हे पुस्तक वाचतांना खूप आनंद वाटला, कारण या स्मृतिगंध पुस्तकामध्ये एका स्त्रीचे आत्मचरित्र दिले गेलेले आहे या पुस्तकाच्या पुढच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या क्रांतिकारांचे चित्र डार्क रंगाने दाखविला आहे ते चित्र श्रीमती गुणाबाई वाघमारे (गुणाबाई गाडेकर) यांचा आहे. या पुस्तकाचे संपादन प्रा. सुनिता सावरकर यांनी केलेले दिसते त्यामुळे त्यांच्या फोटो खालील थोडक्यात त्या आत्मचरित्र्याचा आणि त्यांचा परिचय केलेला दिसतो. स्मृतिगंध पुस्तकाची पाने मला पृष्ठापासून ते शेवटपर्यंत ११४ पाने आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर या पुस्तकात मध्ये श्री. गुणाबाई गाडेकर यांचे आत्मचरित्र दिलेले आहे,आणि त्यांनी कशा प्रकारे संकटांना सामोरे जाऊन आपले कर्तव्य पूर्ण केले आहेत असे आपल्याला दिसून .येते. त्यामुळे हे आत्मचरित्र वाचतांना मला उत्साह आणि अभिमान ही वाटला कारण दुसऱ्या तिसऱ्या देशातील नसून ही स्त्री भारतामधील आहे आणि तिचे काम आणि कार्य कौतुकास्पद आहे विषश म्हणजे यांचा जन्म अस्पृश्य मानल्या गेलेल्या चांभार समाजात झाला या पुस्तकांमध्ये गुणाबाई गाडेकर यांच्या बरोबर अजून एका स्त्रीचे उल्लेख आलेला आहे. शिवाय आत्मचरित्रामध्ये अन्य गोष्टी सुद्धा विस्ताराने मांडलेल्या आहेत. ज्यामध्ये त्या काळाचे त्या कालखंडाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते .विद्यार्थिनी हे पुस्तक हाताळावे असे मला वाटते. स्मृतिगंध या आत्मचरित्रात्मक पुस्तकाची भाषाशैली ओघवती, सर्वांना समजणारी. अशी आहे. स्त्री जाणीव या आत्मचरित्रातून दिसतात. स्त्रियांना समाजात कसे वागवले जाते त्यांच्यासाठी काय करावे हे या आत्मचरित्रामूळे समजते. मला हे आत्मचरित्र खूपच आवडले हे आत्मचरित्र हाताळण्यास सोपे आहे. पुस्तकाचे मुख्य पृष्ठ अतिशय सुबक असे आहे. पुस्तकाची किंमत ९० ही सर्वसामान्यांना परवडणारी आहे एकूण पृष्ठ संख्या ११४ आहे. बांधणी योग्य आहे.
मौळे नयना सोमनाथ
प्रथम वर्ष,कला, त्र्यंबकेश्वर