Share

धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
छोटे-छोटे वाटणारे अनेक सरकारी निर्णय बर्याच सामान्य लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात व त्याचे बरेच दूरगामी परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात या विदारक वास्तवाची जाणीव खूप अस्वस्थ करून जाते .
दारिद्र्य-निराशा-अगतिकता यांच्या चक्रात अडकलेल्या धरणविस्थापितांच्या आयुष्याचे भेदकपणे अचूक चित्रण करणारी अशी दुसरी कादंबरी मराठी साहित्यविश्वात नसावी .

Related Posts

आयुष्यात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव कसा पडतो असे एकमेव उदाहरण म्हणजे हे पुस्तक

Gauri Sahane
Shareजेफ केलर यांचे मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही हे तुमच्या आयुष्यात यश तुमच्या विचारांनी कसे येते याचे एकमेव उदाहरण आहे. जेफ केलर...
Read More