धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
छोटे-छोटे वाटणारे अनेक सरकारी निर्णय बर्याच सामान्य लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात व त्याचे बरेच दूरगामी परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात या विदारक वास्तवाची जाणीव खूप अस्वस्थ करून जाते .
दारिद्र्य-निराशा-अगतिकता यांच्या चक्रात अडकलेल्या धरणविस्थापितांच्या आयुष्याचे भेदकपणे अचूक चित्रण करणारी अशी दुसरी कादंबरी मराठी साहित्यविश्वात नसावी .