अंतरीचा मागोवा

Share

Review By Dr.Rohini Bhiku Yewale, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
अंतरीच्या मागोवा या पुस्तका त लेखकाने कै. जी के प्रधान यांच्या know The -self हे इंग्रजी पुस्तक त्यांच्या मृत्यू नंतर प्रसिद्ध झाले. या पुस्तकातील बहुतेक भाग अज्ञात अशा अंतर प्रेरणेतून लिहिला गेला आहे. अध्यात्म वरील हे कथन वाचण्यात अत्यंत चांगले आहे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे सर्वसामान्य वाचक या दोघांनाही याचा मोठा लाभ होईल. वाचकांशी थोडीशी हितगुज करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक साधक आणि त्यांचे गुरु यांच्यावरती आधारलेले आहे.स्वामी आणि साधक यांच्यातील संभाषण आणि स्वामींची भाषणे यातून हे पुस्तक उभे राहते. प्रत्येक साधकांनी आपण कोण?हे आपले आपण जाणून घ्यायचे आहे. ते कुणी गुरु किंवा स्वामी हे करत नाहीत आपणच अंतर्मुख होऊन आपण कोण?आहे हे ओळखायचे आहे,यासाठी लेखकाने सर्वांसमोर ज्ञानमार्ग ठेवलेला आहे.आत्मज्ञानासाठी इतर कुठे जाण्याची गरज नाही,हा काही हरवलेली वस्तू शोधण्याचा प्रकार नाही, कारण इथे काही हरवलेलेच नाही, स्वतःचे स्वाभाविक रूप म्हणजे प्रज्ञा, बोध आणि जाणीव. तेच आपले स्वरूप. आपलेच आपण आपल्यापैकी प्रत्येक जण आपले स्वरूप आपल्यातच आहे ते शोधत हिंडण्याची जरूर नाही. अज्ञानाचा अंधार दूर सारून आपण हे जाणून घेतले पाहिजे असे या पुस्तकात सांगितलेले आहे. खरा धर्म म्हणजे काय त्याचा शोध घेण्यासाठी व्यक्तीने फक्त योग्य वर्तन कोणते व बरोबर कृती कोणती हे पाहून समजून घेतले पाहिजे ,असे लेखकाने सांगितले आहे. स्वतःला ओळखण्याची इच्छा,ओढ असणाऱ्या सर्वांनी हे पुस्तक वाचावे हे सांगायला मला निश्चितच आनंद होतो.