Share

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.
शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.
आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाच्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.

Related Posts

बलुतं

Tanaji Mali
Shareबलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी...
Read More

पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे आठवावे

Tanaji Mali
Shareसाने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे . “पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे आठवावे अशी केलेली आहे.” ही व्याख्या...
Read More