आपण जिंकू शकता

Share

आपण जिंकू शकता – शीव खेडा.

भोईटे गायत्री सचिन. एस .एस .वाय .बी. एस सी .
विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती.

प्रस्तावना :
पुस्तक परीक्षणासाठी मी जे पुस्तक निवडले आहे ते मार्गदर्शनपर पुस्तक आहे. या पुस्तकाचे शीर्षक ‘आपण जिंकू शकता ‘असे आहे. या पुस्तकाचे लेखक शीवखेडा हे आहेत. या पुस्तकामध्ये प्रथम प्रस्तावना नंतर आभार आणि नंतर अनुक्रमणिका आहे. आपण जिंकू शकता हे पुस्तक ३०४ पानांचे आहे. पुस्तकाचे शीर्षक हे ठळक असून लेखक शिवखेडा यांची ही प्रतिमा आपल्याला मुखपृष्ठावर दिसून येते. या पुस्तकाचे प्रकाशानाची तारीख वर्ष 2014 आहे. पुस्तकावर “विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रमाणे करतात” हे वाक्य म्हणजे प्रारंभिक छाप होय. या प्रारंभिक छापावरून पुस्तक किती अप्रतिम आणि उपयोगी आहे ही समजत म्हणून मी हे पुस्तक निवडले.
सारांश :
कथा सूत्राचे स्वरूप लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. हे एक गोष्टी प्रमाणे आहे. या पुस्तकात प्रमुख विषय जसे महत्व दृष्टिकोनाचे ,यश ,प्रेरणा ,आत्मप्रतिष्ठा ,परस्पर संबंध आणि परस्पर संवाद कौशल्य आणि विकास सुप्त मन आणि सवयी, ध्येय ठरवणे आणि नीती मूल्ये आणि दूरदृष्टी आहेत. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अंगी बांधून नकारात्मक दृष्टिकोनावर लाथ मारणे आवश्यक आहे. उचित ध्येय म्हणजे नेमकं काय? आणि त्यासाठी आपण काय मार्ग निवडावा ही आहे कथेची पार्श्वभूमी. या पुस्तकामध्ये कोणतेही पात्र दिलेले नाही फक्त लेखक आणि वाचक हेच महत्त्वाचे पात्र आहेत. लेखकाची भूमिका श्रीकृष्णासारखे आहे आणि वाचकाचे अर्जुनासारखे असली पाहिजे असाच हे तो फक्त या पुस्तकामध्ये आहे.
विश्लेषण :
लेखकाची लेखन शैलीची भाषा एकदम सरळ ,सोपी आहे. काहीच अवघड नाही. सुस्पष्ट उदाहरणे देऊन ,गोष्टी सांगून लेखकाने मत मांडले आहे. आणि विशेष म्हणजे सर्व विषय मुद्दे सुद्धा आहेत त्यामुळे वाचताना सोपे जाते. कथानकाची संरचना सुद्धा लेखकाने एकदम ओळीने मांडली आहे. जसे हे पुस्तक कशा प्रकारच आहे ,कोणासाठी आहे ,कसं वाचाव, व कृती कशी करावी ,त्याची सवय कशी लावावी हे सगळं. लेखकाने त्याचे विषय किंवा संदेश मांडण्यासाठी गोष्टींचा विचार केला, महात्म्यांचे विचार मांडले त्यामुळे लेखकाला काय म्हणायचे आहे ते त्या पहिल्या दिलेल्या विचारात समजत होते आणि लगेच आकलन होते.
पुस्तक वाचताना वेळ किती झाला किंवा आपल्याला भूक लागली आहे हे समजतच नव्हते .झोपेची वेळ झालेली असताना ,झोप लागली असतांना झोपू वाटत नव्हते कारण असं वाटायचं की पुढे कोणीतरी आपणास शिकवत आहे आणि आपण झोपायचं कसं? याप्रमाणे भावनिक परिणाम मला पुस्तक वाचताना जाणवला आहे.
ताकद आणि कमकुवतपणा :
इतरांच्या चुकांमधून शिकणे, आत्म प्रतिष्ठा ,सकारात्मक दृष्टिकोन ,जबाबदारी, स्वयंशिस्त,संवाद कौशल्य, इत्यादी गोष्टी ही ताकद पुस्तकाची आहे. लेखकाने संवादाची साथ थोडी दिली असती तर ते विचार मनावर लवकरात लवकर बिंबले असते किंवा त्यात छायाचित्रे दाखवले असती तर अजून लवकर त्या विषयाचे आकलन झाले असते की त्याची कमकुवत बाजू आहे.
वैयक्तिक विचार:
मनाला सुप्त खाद्य कसं पुरवावं ,आत्मप्रतिष्ठा कशी वाढवावी ,बोलणं कसं असावं, ऐकावं कसं ? हे सगळं शिकून मी ते माझ्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करते आणि या पुस्तकांनी मला जगताना खूप मदत केली आहे.
धन्यवाद..