Share

कु.निर्मला बाबू मेमाणे तृतीय वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर
डॉ.प्रकाश बाबा आमटे लिखित “प्रकाशवाटा”हे त्यांचं आत्मकथन आहे.या आत्मचरित्रातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते .
प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर.आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करतं सतत चालतं राहणे,मुळात हे फार कठीण काम असतं.हे काही सर्वांनाच जमतं नाही.आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी तर सर्वंच जगतात पण समाजातील दबलेल्या,कुचलेल्या आणि वंचित व दुर्लक्षित घटकांतील लोकांसाठी जगायला किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला किती जणांकडे वेळ असतो ?
आज आपल्याला योग्य तो आहार आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.पण त्या रानात मानवी वस्तीपासून कोसो दूर राहणाऱ्या आदिवासी समाजाचा काय ?त्यांच्यापर्यंत या बेसिक सुविधा खरंच पोहचतात का ?यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपर्यंत कोणी किती आणि काय काय प्रयत्न केले आहेत ? हा प्रश्न आपल्यापैकी प्रामुख्याने किती जणांना पडतो ?त्या माणसांसाठी सुद्धा काही करायला हवं,त्यांना सुद्धा योग्य त्या सुविधा मिळायला हव्या.यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे किती जणांना वाटते ?
हे प्रश्न काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला पडले होते.त्या व्यक्तिमत्त्वाचं नाव होतं,’थोर समाजसेवक बाबा आमटे”.यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायला सुरुवात केली आणि उत्तरे शोधून शांत न बसता त्यावर उपाय शोधून अंमलबजावणी सुद्धा केली.समाजातील कुष्ठरोगी,अंध,अपंग,कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं आहे. बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये “आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना या ठिकाणी आश्रय त्यांनी दिला.
डॉ.प्रकाश आमटे यांनी “हेमलकसा”या अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासी समाजासाठी कार्य करायला सुरुवात केली,आणि येथूनच सुरुवात झाली “लोकबिरादरी प्रकल्पा’ची.प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले अप्रतिम पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी आहे .
डॉ.प्रकाश आमटे म्हणतात :- ‘आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबा आमटेंच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.’सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण अनेकांना प्रेरणाही देते.
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी हे दोघे गेली ४० वर्षे कोणतीही तक्रार न करता सगळ्या अडचणींवर मात करत हेमलकसा येथे आनंदाने काम करत आहेत.. त्यांना असे जगताना पाहून आयुष्य काय असते, याची खऱ्या अर्थाने जाणीव होते..”आदिवासी कधी जन्माला आणि कधी मेला याची कोणाला काही परवाच नसते”.या पुस्तकांतून ही बाब अधोरेखित होते.पुस्तकातून आपल्या समाजातील अनेक गोष्टीवर प्रकाश आमटे भाष्य करतात.अंधश्रद्धा, रूढी-परंपरा,वृक्षतोड,आदिवासींचे जीवन व त्यांना न मिळणाऱ्या सुविधा,शिक्षण,आरोग्याचा तुटवडा व इतर अनेक बाबी आपल्याला वाचायला मिळतात..

Recommended Posts

Ikigai

Sanjay Manohar Memane
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

Sanjay Manohar Memane
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More