प्रमिला नामदेव राउत (ग्रंथालय प्रशिक्षणार्थी)
जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे.
खजिन्याच्या शोधार्थ निघालेल्या एका साहसी मेंढपाळाची …नव्हे एका सफरीवीराची प्रवासकथा.
अँडालुसिया येथील ‘सँतीयागो’ नावाच्या एका मेंढ पाळाची कथा आहे. त्याची जन्मभूमी असलेल्या ‘स्पेन’ पासून ते ‘इजिप्त’ च्या पिरॅमिडस पर्यंतचा त्याचा साहसी प्रवास आपल्या आंतरिक विचारांचा तळ गाठतो. सँतीयागो च्या जीवनाचा एकच उद्देश होता तो म्हणजे प्रवास करणं…भटकणं…! शेतकरी असलेल्या त्याच्या कुटुंबाला त्याला धर्मगुरू बनवायचं होतं. पण सँतीयागोला धर्मगुरू बनायचं नव्हतंतर जागप्रवास करायचा होता. असा प्रवास फक्त मेंढपाळच करू शकतो हा विचार करून तो मेंढपाळ बनला आणि जग प्रवासाला निघाला. या प्रवासात त्याला आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांमधून तो खूप काही शिकत होता.
त्याने पाहिलेले स्वप्न साकार करण्याची त्याची धडपड आणि त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आणून पोहचतात. या प्रवासात भेटलेल्या एका वृद्ध राजाने दिलेले युरीम आणि थामिम त्याला स्वप्न पहायला आणि सकारात्मक विचार करून पुढे जाण्यास मदत करतात. तो ज्या खनिज्याच्या शोधार्थ वाटचाल करतो त्या खजिन्यापासूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती हे त्याला शेवटच्या क्षणी लक्षात येते.
या कथेचा मतितार्थ असा की इतरत्र ज्या खजिनाचा आपण शोध घेतो ते आपल्या जवडच अतात आणि ते मिळविण्यासाठी म्हणजेच स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील कसे राहावे याचे मार्गदर्शन करणारी अशी ही रंजक बोधकथाच म्हणता येईल.
स्वप्नांच्या शोधाचा मार्ग दाखवणारी अशी ही कादंबरी ‘द अल्केमिस्ट’ सर्वांनी अवश्य वाचावी.