“द आंत्रप्रेन्युअर” ही शून्यातून उभारलेल्या उद्योजकाची कहाणी. पुस्तकाचे नाव ‘द आंत्रप्रेन्युअर’ आहे म्हणून फक्त ज्यांना कुणाला बिजनेस करायचा त्यांनीच वाचावे असे
नाही .लहान ,मोठे ,विद्यार्थी, पालक , कॉलेजचे विद्यार्थी ,जॉब करणारे, बिजनेस करणारे कोणीही वाचावे असे हे पुस्तक आहे. यात लेखकाने कॉलेजमध्ये टाईमपास करण्यापासून ते यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत काय काय चुका केल्या आणि त्या कशा सुधारल्या हे सांगितले आहे .यात खूप मोठा मुलाचा वाटा म्हणजे लेखकाच्या वडिलांचा ! ज्याप्रमाणे वडिलांनी लेखकांना समजावले ते लेखकाच्या आयुष्याला चांगली दिशा देणारे ठरले. ‘द आंत्रप्रेन्युअर’ हे शरद तांदळे यांचे आत्मकथन आहे. अर्थार्जनासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक मराठी तरुणाची कहाणी आहे….!