Share

‘द हिडन हिंदू’ ही अक्षत गुप्ता यांची कादंबरी हिंदू पुराणकथांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक रहस्यमय आणि थरारक कथा आहे. कथेचा नायक पृथ्वी जो एकोणीस वर्षांचा युवक आहे व तो ओम् शास्त्री नावाच्या रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे. ओम् शास्त्रीला पकडून भारताच्या एका निर्जन बेटावरील अत्याधुनिक सुविधांमध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे तज्ज्ञांची एक टीम त्याला नशेची औषधे देऊन आणि सम्मोहन करून त्याच्या भूतकाळाबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करते. ओम् शास्त्रीचा दावा आहे की त्याने सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगांचा अनुभव घेतला आहे आणि रामायण तसेच महाभारताच्या घटनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचे हे दावे आणि त्याच्या अमरत्वाचे रहस्य कथेला अधिकच उत्कंठावर्धक बनवतात.

कादंबरी अत्यंत वेगवान आहे आणि वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. अक्षत गुप्ता यांनी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश करून हिंदू पुराणकथांना नव्या दृष्टिकोनातून मांडले आहे. कथानकातील रहस्य आणि थरार वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतात.
‘द हिडन हिंदू’ भाग १ ही कादंबरी हिंदू पुराणकथांच्या पार्श्वभूमीवर आधारित थरारक आणि रहस्यमय कथा शोधणाऱ्या वाचकांसाठी नक्कीच आकर्षक ठरते.

Related Posts

यह तीर्थ महातीर्थो का है ,मत कहो इसे काला पानी ,तुम सुनो ,या की धरती के कण-कण से गाथा बलिदानी .

Dr. Uday Jadhav
Shareराष्ट्रासाठी आपल्या प्राण्यांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणाऱ्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यामध्ये क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल...
Read More