Book Review By Pradeep Bachhav (Librarian) Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole
२९४ पानाचे हे छोटेखानी परंतु वाचायला सुरवात केल्यावर पूर्ण वाचण्यास प्रवृत्त करणारे लिखाण या पुस्तकात आढळते, जेम्स क्लीअर या सुप्रसिध लेखकाने सदर पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचे नववी आवृत्ती सुरु आहे. या जगप्रसिद्ध पुस्तकाचे भाषांतर भाषांतरकार सुदर्शन आठवले यांनी केले आहे. जसे अणु अविभाजित असतो, पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण असूनही प्रचंड उर्जा त्यात सामावलेली असते त्या प्रमाणेच आपल्या रोजच्या जीवनात अतिशय सूक्ष्मपणे आपल्या सवयीत रोज बदल घडवला व त्यात नियमितता, सातत्य राखले तर प्रचंड मोठा बदल आपल्या जीवनात घडू शकतो. हे पुस्तक वाचून आपणास असे कळते की आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर महान विचार केला पाहिजे परतू लेखकाने याउलट असे सुचविले आहे की जर चांगल्या सवयी अंगी बाणवल्यास आपण जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो. या पुस्तकात यासाठी सोपी तंत्रे दिली आहे. प्रत्तेकाने वाचावे असे हे पुस्तक.