“मनकल्लोळ” हे चपखल नाव असलेल्या या ग्रंथात मनोविकार हा गुंतागुंतीचा आव्हानात्मक विषय अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांनी निवडून त्याला उचित असा न्याय दिला आहे.
आजही समाज मनात मनोविकार म्हटले की गोंधळ,भीती, अगतिकता व काळीमा अशा प्रतिक्रिया उमटतात त्यामुळे एकीकडे उपचाराची सोय नसणे व दुसरीकडे योग्य वेळी उपचार न घेणे या कात्रीत अनेक रुग्ण सापडले आहेत अशा परिस्थितीत हा ग्रंथ आजार व उपचार या दोन्हींची माहिती देऊन सकारात्मक मानसिक आरोग्याचा प्रसार करण्यास महत्त्वाचे योगदान करत आहे. “मानसिक आरोग्याशिवाय आरोग्याचा विचार अपूर्ण आहे” हे मुलतत्व मला या ग्रंथात दिसते.
या ग्रंथाचे खास वैशिष्ट्ये असे की मनोविकारांची केवळ लक्षण किंवा केस हिस्टरी नमूद करून ते थांबत नाही तर त्या मनोविकारांचा चित्त थरारक इतिहास,त्यांच्या गाजलेल्या केसेस,त्यांच्यावर विविध माध्यमातून झालेले लिखाण, त्यांच्यावरचे चित्रपट अशा अनेक आयामातून त्यांचा शोध घेण्याचा अभिनव प्रयत्न या ग्रंथात केला आहे.मानशास्त्रज्ञांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही संग्रही ठेवावा असा उत्तम मानसशास्त्रीय संदर्भग्रंथ हा आहे.