Book Review : Gajare Trupti Dipak, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
महाराजा सयाजीराव आणि जन्मभूमीची ओढ इतिहास हे पुस्तक वडोदऱ्याचे आदर्श शासक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारित आहे. पुस्तकात महाराजांच्या जन्मभूमीविषयी असलेल्या विशेष प्रेमाचा इतिहास अधोरेखित केला आहे. त्यांनी त्यांच्या प्रजेप्रती दाखविलेली कळकळ, समाज सुधारणांमध्ये घेतलेला पुढाकार, शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी केलेले योगदान तसेच स्वराज्य निर्माणासाठी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिलेला पाठिंबा यांचा तपशील पुस्तकात विस्तृतपणे मांडलेला आहे.
बाबा भांड यांनी इतिहास, चरित्र आणि संवेदनशीलतेला एकत्र गुंफून महाराजा सयाजीरावांच्या जीवनकार्याचा अभ्यासपूर्ण व भावनिक दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे. वाचकांना भारतीय इतिहासातील या महान नेतृत्वाची ओळख करून देणारे आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळवणारे हे पुस्तक आहे.