Share

नाण्याला दोन बाजू असतात , त्या खऱ्या त्यातली आपल्याला जी पाहिजे ती मिळेलच असे नाही. कधी तरी मोह सोडून त्याग करावा लागतो या मृगजळाचा… पदरात फक्त एक गोष्ट शिल्लक राहते , देवाकडे एखादे मागणे मागून पहावे , माझी आरोळी तो लवकर ऐकल. असे असले तरी माझे गाऱ्हाणे देवापर्यंत पोहचवायचे आहे म्हणल्यावर चंचल मनाने देवाच्या नावाचा टाहो फोडायचा आणि घट्ट डोळे मिटून प्रार्थना करायची . निरागस मनाने पुनः एकदा जिंकण्याच्या उमेदीने पाऊल थोडस चांगल टाकायच .
यज्ञाच्या ज्वाळा कणखर पद्धतीने जाऊन आभाळाला भिडतात. तसा मी या संसारात कौतुकाच्या पाऊसात न्हाऊन जातो . दोन्ही आगी शांत होऊ शकतात, पण देवाची अवकृपा काही होत नाही . सुखाच्या शोधात एवढा गुरफटतो की इतरांनी सुद्धा माझे अनुकरण केले पाहिजे ही माझी साधी-सुधी छोटी प्रार्थना. कधी काळी वेळेला न्याय मिळाला नाही म्हणून जीवसृष्टी एकटी पडत नसते . सकाळी दारावर उमलणारे फूल रोज कानात येऊन सांगते की, माझा प्रवास फक्त दोन सेकंदचा बागेतून यायच न् देवापाशी जायच . खूप कंटाळा येतो बर का एका जागेवर . पण समाधान काय असते ते त्या फुलाला कदाचित माहीत नसावे . रुपकाच्या मागे धावून फक्त क्षणिक व अधिक सुखाची प्राप्ती झाली पाहिजे अस त्याच मत .

भुरळ पाडणारे क्षण या छोट्या पडद्यामागे कितीतरी विचार बदलायला भाग पाडतात . आणि जाणि‍वेची तर लकप न लागता माझ्या मनात धर्मयुद्ध सुरू होऊन स्वप्नाच्या मागे इतका सैरभैर पळत सुटतो . साऱ्या सुखाची लोळण फक्त माझ्याकडेच व्हावी . जस की इंद्रपद मिळाले म्हणून समजा . कधी काळी फुलाच्या सुगंधावर मी इतका बेभान होऊन कालक्रमण करून अमृताचा घोट घेऊन असाच आपसूक जीव जावा . अस हे उपभोग्य मायावी रुपक मृगजळ . पण मला वाटते आनंद व समाधान यामध्ये अमृताची माधुरी आणि अप्सराचे लावण्य या स्वप्नापुढे अलगद प्रेम देऊन जाते .
शरीर थकले असले तर मनाची हलचल अजूनही त्यातच गुंतलेली वाटते . अस्तित्वाचा मागोसा घेत जर अंधाऱ्या राती पाऊल वाटेने चालताना शांततेने अभ्यास केला म्हणजे आभास जणू चांदरातीचा सोबती आणि माझे बोलके व्यासपीठ इतकेच या गुढाचे रहस्य …
या रहस्यमय नाटकात जीव इतका गुदमरल्यासारखा , तडफडल्यासारखा पण हृदयाची ज्योत प्रदक्षिणा घालून उभी राहते आणि सांगते , स्वतः खालचा अंधार सुद्धा नाहीसे न करणारी दीपज्योत ज्यावेळी घरभर तेवत राहते तेव्हा मला हे अस्मान सुद्धा ठेंगणे वाटू लागतात . नशिबसुद्धा तयार असतात , स्पर्धा मान-अपमान , सुखं-दुख त्याचा त्याग हा करावाच लागतो ! पुढचा श्वास घेण्यासाठी मला आधी घेतलेला श्वास सोडावा लागेल हे कदाचित माहीत ही नसते…. त्यामुळे मृगजळात मायावी शक्ति कल्पना नवे चेहरे कमीच बरे .
आयुष्यातल्या काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतात ,
पण दिवसा आलेले हे चांदणे बरे नव्हे…. !
माझ्या मर्मबंधाचे सुख हे , पळत्या ढगाची सावली असल्याचे नुसते माझे गोडबोलाचे समज . मी पळालो की ते पण धावू लागतात . कायमचे सोबती फक्त माझ्यातला मी . सुंदर बाह्यसृष्टि व अंतसृष्टि याच्या मधोमध असणारी अस्सलेची गोडी ही नकलेत येत नसते . म्हणजे अमृतावरील काव्य ऐकून नेमकी चव कशी आहे हे सांगणे जरा कठीणच जाईल .
स्वप्नाचा आनंद जागृतीत मिळत नाही . म्हणून खेद करण्यात गैर नाही . पहाटेच्या दवबिंदूची माळ करून गळ्यात घालण जमणार नाही . मोहक बरसणाऱ्या सरीकडून जेव्हा इंद्रधनुष्यातल्या रंगात कुंचले बुडवून चित्रे रंगवता येत नाही . आणि फुलांचा सुगंध साठवून अत्तरासारखी कुपी तयार करणे मलाही जमेनासे आहे . सुंदर दिसणाऱ्या वस्तूपासूनचा आनंद कुणी कमी मानला आहे का ? एवढ्या सुप्त गुणांचा सहवास जर मनुष्याच्या मनाला लागला तर त्याच्या लुसलुशीत ओठांवरून साखर सुद्धा निमुळत्या मार्गाने खाली घसरून आत्महत्या करेल . आणि रात्रीच्या झोपे मधील बडबड म्हणजे ऐतिहासिकच .
म्हणजे समुद्रात बुडी घेऊन कोरडे राहणे कसे आवडेल आणि असेलही पण पापाच्या चिखलात जर कमळ उगवत असतील तर त्या फुलांनी सुगंध देऊन देवाच्या पायाजवळ कसे जावे . आणि त्याचा जन्म तर त्यागासाठीच नाही का ? मला इथे भ्रमक जगात सुंदर साखर पेरायला आवडेल . नितांत विश्वास दाखवणारे ते चेहरे आपले प्रेम आहे म्हणून दाखवण्याकरीताच ती तसबीर रोज झोपताना उश्याखाली ठेऊन दरवळणाऱ्या रातीचा उसासा करून घ्यावा पाहतो . नाहीतर आकाशाला शीतल चंद्र कुतुहलतेने पहिला म्हणून घरातला तेवत असणारा नंदादीप कोणी विझवत नसत . म्हणजे रडावेसे वाटले तर आपसूक पाऊस सुरू व्हावा ज्यातून माझ्या डोळ्याच्या पापणीला ओले झाल्याचे दुख राहणार नाही . त्या धुंद कळ्यांना विचारा त्यांना तोडायला येणारे हात किती कठोर असतात . मंदमधुर
सुगंधाच्या स्मृतीने ते इथपर्यंत खेचले गेलेले असावे . अगदी त्या श्रीमंत काटेरी आणि कठोरश्या सुंदर सतारीला तरी कुठे माहीत असते की तिच्या बोलावर अप्सराच्या नृत्याचा कोंडमारा झालेला असतो .
आपल्या हातून काय पेरायचे ते आपण ठरवायचे असते , अस दृश्य रेखाटताना तारकापुंज एकत्र येऊन आपली बाजू मांडताना तो किती प्रकाश देतो , सुरेख दिसतो याच नेहमी गुणगान गात राहतो .तस आपल्याला इच्छा मरण असताना माणुसकीचा पोशाख सदैव अंगावर घालून जीवनाचा आनंद लुटायचा असतो .

जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही ,
जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही….
अंतराळात भटकणारा एखादा आत्मा वासनेच्या शोधात जिन्याने पृथ्वीवर अवतार घेऊ बघतो . आणि आम्ही महान झालो दगडावर काळी रेघ ओढल्यागत कधी पुसणार नाही ही मोहमाया वाढत जाते. आणि आम्हाला वाटत आम्ही आई बाप झालो . हे खोट विश्वात दाबून दडपून ठासलय . आम्ही जीवंत असूनही मरणासन्न अवस्थेत सगळ जग पाहू घालतो . एक शोधाच्या प्रवासासाठी त्या आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तीना उंटाणा विचारून पहा , सांगतील ते फक्त माझ्या शोध बाकी आहे . त्यामुळ ह्या परिस्थिती मध्ये कोणी कोणाच नसत . नंतर मग पाझर फुटून एका मृगजळातून मुक्ती मिळाल्या नंतर असे अनेक दानशूर कर्ण बाहेर पडून फक्त निसर्गाच्या भटकंती करत राहतात . सुरेश भट यांनी फार सुंदर ओळी सांगितल्या की ,

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो ,
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते….

असा हा साधा सोप्पा मृगजळाचा प्रवास……!

पुस्तकाविषयी आमचे मत…
डोळ्याच्या पापणीबरोबर साठवेल मी इतका मृदगंध पाहिला . पण याची ठराविक वेळ अशी ठरलेली नाही . माणसातले कला गुण छंद आपणास आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात , या आनंदाच कारण म्हणजे आठवणींचा सुखददायक समारंभ . कोणताही व्यक्ति आठवणींच्या मार्गाने जाऊन त्या दरवळत्या सुवासाने मंत्रमुग्ध होऊन क्षणभर थांबून एक नवीन अध्याय सुरू करत असतो .
वि.स. खांडेकर यांच्या मृगजळातील कळ्या हा रुपक संग्रह अत्यंत नेत्रदायी. व सोन्याने भरलेला एखादा हंडा म्हणाव की काय ? याचा अर्थ काल्पनिक विविध पद्धतीने नटवून सजवून एकत्र आणल आहे . म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात असतात तश्या वास्तवी नसतात . एक वेगळा आयाम ह्या द्वारे पाहायला मिळतो सत्याची जाणीव करून घेण हे जिकिराचे काम असते . या प्रवासात इतक्या ठेचा खाव्या लागतात , त्या नंतर अनुभवाचे धडे आपोआप अंगी बिनसतात . कष्ट सोसणाऱ्या हाताला अमवास्येचा अंधारसुद्धा भिऊन पळतो .
सगळ्या जगासमोर उभ्या हाताने अभिनय करू पाहणारा माणूस आतून कुठेतरी खचलेला असतो . मंदिरातल्या मूर्तीचा शृंगार पाहू पाहणारे माणस एका स्तुतीने अंध होत असतील का ? आणि चित्राचे रंग सुद्धा हळूहळू चौकटीवाचून फिक पडत आहे . म्हणाल तर अमृताला सुद्धा पेल्यातच ठेवाव लागत , पण अशी शोभिवंत जागा देवळाच शिखर कापून मिळणार नाही . मनुष्य नावाच्या चित्रपटात एक उंच जाणारी ज्योति भोवतालचा अंधार उजळून मोठा होत असतो . आपल्याजवळ आहे ते वाटून रिकामे होण्याची सवय किंबहुना माझ्या हातांना असावी . आश्रित मनाला बैठे बसून राहण्याची या जन्मात मुभा नाही .
सध्याच्या काळात टिकात्मक दृष्टिकोण जरी बदलत गेले असले पण सर्वस्पर्शी लयेची झंकार आजही कानात गुंजताना ऐकू येते . कधी काळी कमळ खुडून नेणाऱ्या माणसांच्या पायाने आपले पाणी गढूळ झाले असावे हे आपल्या लक्षात येत नसते . फक्त टिकात्मक परीक्षण झाले म्हणजे उत्तीर्ण होणे असा याचा अर्थ नाही .
केविलवाण्या स्थितीतून जेव्हा नको असलेल्या गोष्टी फेकून दिल्या जातात , कोणे एके काळी ज्याचा आपण पुरेपूर उपभोग घेतलेला असतो अश्या माणसांच्या चेहऱ्याच प्रतिबिंब कस पडत असेल बर…. फेसळणाऱ्या लाटांतून एखाद्या नौकेन मोठ्या कष्टाने वाट काढत जावी . आणि अतोनात एकांत जाणवावा . ज्याचे मस्तक हे नेहमी लताकुंजात उमललेल्या प्राजक्ताच्या मकरंदा सारखा हेवा वाटावा असे हवे तर हजार वेळा माना कापून ठेवणारा असा मनुष्य आपले पाऊल जगाच्या जागी स्तब्ध ठेवत असतो .
आत्तापर्यंत घेतलेली सर्व लक्तरे पांघरलेल्या भिकाऱ्याप्रमाणे अवाजवी वाटू लागतात . म्हणजेच मोह दुनियेतून बाहेर आल्यावर चाँदनी रात्र जणू विझून गेलेल्या यज्ञ कुंडसारखी असते . धड मस्तकाला राख सुद्धा लावता येत नसते . बहरलेल्या वसंतात एखाद्या वाळवंटात सुद्धा नंदनवन फुलून यावे असे हे दूरदर्शी वास्तव . यात रूपाचा प्रश्न आला की घड्याळ स्वत: च्या सौंदऱ्याकडे अभिमानाने पाहत असतो . इतर लोक बेइमान झाले म्हणजे माझ्या मनाला पळण्याची तशी अजिबात मुभा नाही . पण क्षणात चंद्राने चमकावे , क्षणात त्या कृष्ण मेघाणे त्याला झाकून टाकावे असा हा मृगजळाचा खेळ .
नाहीतरी प्रदर्शने पाहायला येणारी माणसे त्या अफाट विस्ताराकडे पाहत म्हणतात , सभोवतालचा वातावरणात आता सोन पिकू घातले आहे . पण सौंदऱ्याच श्रेय त्या दगडाला सुद्धा नाही, आणि देवालाही नाही . या अनंत विश्वा मध्ये मनुष्याच्या बुद्धीचा डोंगर इतका राकट आहे की त्याला जवळ करणारे दुसरे एक प्रेमळ हृदयच असते…

Related Posts

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि संघर्षाचा थरारक अनुभव देणारे पुस्तक

Sachin Shelar
Shareप्रस्तावना **संभाजी** ही मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे, जी लेखक विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. ही कादंबरी छत्रपती...
Read More