Share

शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु झाला. मृत्युंजयसाठी सतत सहा सात वर्ष त्यांनी अभ्यास केला. संपुर्ण हिंदुस्थानभर प्रवास करून मनन चिंतनाने हि कथा त्यांनी डाेळस बनविली 

खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवणगाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणी भारलेलं हाेत कर्णाचं जिवण. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडलांविना शापीत कर्ण म्हणून थाेरांनी त्याला डिवचले पण अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत, मरणालाही हसत हसत कवटाळनारा हा मृत्युंजय म्हणुनच प्रेरणादायी ठरताे.

शिवाजी सावंतांची भाषा खरोखर अदभुत आणी रसाळ आहे. पुस्तक एकदा वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर खाली ठेवु वाटत नाही. वर्णन इतकं छाण आहे कि आपण कर्णाबरोबरच ते सारं जणु अनुभवत आहोत अस वाटतं म्हणुनच हे अनुभवण्यासाठी #मृत्युंजय सर्वांनी एकदा तरी वाचलच पाहीजे…!!

Related Posts

हिंस्त्र कळपाला बळी पडलेल्यांची जखमीकविता

Dr. Rupali Phule
Shareडॉ. संतोष पद्माकर पवार, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग,अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर गंगाधर अहिरे यांची एक सशक्त कवितानिर्मिती म्हणून ‘आम्ही लोक...
Read More