Book Reviewed by BACHHAV SHUBHAM BHALCHANDRA, FYBSC
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहिलेले
'रिच डॅड पुअर डॅड' हे वैयक्तिक वित्तविषयक अभिजात पुस्तक आहे, जे लेखकाच्या
जीवनातील दोन वडिलांच्या व्यक्तिमत्त्वांच्या दृष्टीकोनांमध्ये विरोधाभास दर्शवतेः
त्यांचे जैविक वडील (ज्यांना 'पुअर डॅड' म्हणून संबोधले जाते) आणि त्यांच्या
बालपणीच्या जिवलग मित्राचे वडील. (referred to as Rich Dad).कियोसाकी
कुटुंब मागील चार पिढ्यांपासून अमेरिकेत आहेत.अमरिकेतील हवाई राज्यातील
हिलो नामक शहर वजा बेटावर त्यांचे वास्तव्य. रॉबर्टचे वडील राफ कियोसाकी
पेशाने शिक्षक, तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या राफ यांनी रॉबर्टला उच्च आर्थिक
वर्गातील व्यक्तींची मुले जाणार्या उत्तम शाळेत घातलं ज्यामुळे रॉबर्टला श्रीमंत वर्ग
मित्र लाभले.
आजच्या टेक्नोसॅव्ही आणि सोशल मिडीयावर असलेल्या पिढीत “रिच डॅड, पुअर डॅड
” (Rich dad poor dad summary in marathi) हे पुस्तक माहीत नसेल असा
एखादा सापडणे कठीणच.अनेकांनी वाचलं असेल, काहींनी पारायणे केली असतील..
पण कीतीजणांनी पुस्तकात सांगीतलेल्या मंत्राचा आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने
वापर केलाय, पुस्तकाचा विषय काढला कारण आजच्या आपल्या लेखाचा
विषयसुध्दा एका बेस्टसेलर पुस्तकाचाच आहे. गेले दोन दशकाहूनही जास्त काळ या
पुस्तकाने अनेकांच्या मनावर गारुड केलंय. अनेक ख्यातनाम व्यक्तिमत्वेसुद्धा
कियोसाकी यांच्या चाहत्या वर्गात येतात.