Share

शेतक-याच्या जीवनातील गोष्टी या पुस्तकांत नमूद केलेल्या आहे. उद्देश, शूद्र, शेतकरी हल्ली इतक्या दैन्य वाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यासंबंधी अनेक कारणे आहेत, त्यापैकी थोड्या बहुमतांचे विवेचन करण्याच्या हेतूने ता पुढील ग्रंथ रचिला आहे, शूद्र शेतकरी बनावट व जुलमी धर्माचे योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राम्हण कामगारांचे प्राबल्य असल्याने भटभिक्षुकांकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐषआरामी असल्याने येगाचे, ब्राम्हण कामगारांकडून नाडले जातात त्यांपासून त्यांस या ग्रंथावलोकनाचे योगाने आपला बचाव करिता यावा असा हेतु आहे, म्हणून त्या ग्रंथास ‘शेतकर्‍यांचा असूड असे नावं दिले आहे.
वाचताना असा आढळण्यात आल की, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर आता ते तीन भेद होण्याची कारणे पाहिली असतां, मुळचे जे लोक शुद्ध शेतकरी आपला निर्वात करु लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करु लागले, ते माळी व जे ही दोन्हीही करून मेंढरें, बकरी वगैरेचे कळप बाळगू लागले, ते धनगर असे निरनिराळ्या कामांवरुन प्रथम ते भेद उपस्थित झाले. असावेत परंतु आता या तीन पृथक जातीच मानतात यांचा सांप्रत आपसात फक्त बेटी ‘व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी, धनगर) पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत आतां पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मुळचा शेतकीचा धंदा
निरुपायाने सोडून उदरनिर्वाहास्तव नानात हेचे धंदे करू लागले ज्यांचजवळ थोडेबहुत अवसान आहे ते आपले शेती संभाळून रहातात व बहुतेक अक्षरशुन्य देवभोळे उघडे नागडे व मुकेकंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल ग्रारा उरला नाही, ते देश सोडून जिकडे तिकडे त्यरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करूं लागले कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा. तसेंच कोणी कंत्राटें व कोणी रायटरी वगैरे नोक-या करुन शेवटी पेनशने घेऊन डॉल मारीत असतात. अशा रीतीने पैसा मिळवून इस्टेटी करुन ठेवीतात, परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहोशी मुलें, ज्यांस विदयेची गोडीच नाही अशी, त्यांची थोड्यांप काळांत बाबुके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नावाने पोटासाठी दोम दोम करीत फिरतात कित्येकांच्या पुर्वजांनी शिपाय-गिरीच्या व कित्येक तर शिंदे-होळकरांसारखे प्रतिराजेय बनून गेले होते. परंतु हल्ली त्यांचे वंशन अज्ञानी अक्षर शुन्य असल्यामुळे आपआपल्या जहागिरी, इनामें गहाण टाकण अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्साने कित्येक तर अन्नासाठी मोताद झाले आहेत. बहुतेक इनामदार जहागीरदांस आपल्या पुर्वजांनी काय काय पराक्रम केले, कसकशी संकटे भोगिली यांची कल्पना मनांत ने येतां, ते ऐत्या पिठावर रेखा ओढून अशिक्षित असल्यामु‌ळे दृष्ट व लोकांचे संगतीने रात्रदिवस ऐषआरामांत व व्यसनांत गुंग होऊन, ज्यांच्या जहागिरी गताण पडल्या नाहीत, अथवा ज्यास कर्जाने व्याप्त केले नाही, असे विरलच. आतां जे संस्थानिक आहेत त्यांस जरी कर्जवाम नाही, तरी त्यांचे आसपासचे लोक व ब्राम्हण कारभारी इतके मतलबी धूर्त. धोरणी आसतात की, ते आमच्या राजेरवाड्यांस विद्येची व सदुनांची अभिरुची लागू देत नाहीत. यामुळे आपल्या खऱ्या वैभवाचे स्वरुप न ओळधून आपल्या पुर्वजांनी केवळ आमच्या चैनीकरितांच राज्य संपादन केले असे आसून मानून धर्माचे योगाने अंध जहालेले, राज्यकारभार स्वतंत्र रितिने पाहण्याचे अंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ दैवावर भर टाकून ब्राम्हण मानून धर्माचे योगाने अंध जहालेले, राज्यकारभार स्वतंत्र रीतीने पाहण्याचे आंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ देवावर भार टाकून बाम्हण कारभा-यांना ओंझळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन जातबांधवांचे कल्याण होण्याचा संभव विशेष, परंतु त्यांच्या डोक्यातुन निघाले नाही, तोपर्यंत कितीही कपाळकुट केली तरी ती व्यर्थच जाणार व इतकेती करून तसे करण्यास कोणी प्रवृत्त झाल्या बाळपणापासून मनावर जाहलेल्या दृढ संस्कारांमुळे या मतलबी धर्माचे विरुद्ध चार गोष्टी ऐकुन त्यांचा विचार करणे त्यांस कोठुन रुचणार व जवळचे कारभारी अगोदर के अशा निस्पृह व खऱ्या जात्याभिमान्याची डाळय शिंजू देणार नातीत, तशांतुन धैर्य धरून एकादयाने मला तशी सवड दिल्यास मोठ्या आनंदाने मी यधामति आपले विचार त्यांच्या पुढे सादर करीन.
असो, जगांतील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पाहाता, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शुद्र शेतक-यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतक-यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशु-पलीकडे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल. हा ग्रंथ अनेक इंग्लिश, संस्कृत व पाकृत ग्रंथ व हल्लीचे आज्ञानी शूद्रा अतिशुद्रांच्या दीन वाव्या स्थितीवरून रचिला आहे.

Related Posts

IAS अधिकारी अन्सार शेख यांचे सर्वांना प्रेरणा देणारी कथा आहे

Seema Auti
ShareUPSC मी आणि तुम्ही – Ansar shaikha रिक्षा चालकांच्या मुलाने रचला इतिहास परिस्थितीवर मात करत बनला सर्वात तरुण IAS मराठवाड्यासारख्या...
Read More

जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश

Seema Auti
Shareपुस्तक परीक्षण – जाधव सुरेखा रामचंद्र , तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमातील तिसरा वर्ग , भरती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय...
Read More

अस्तित नास्तिकांच्या दर्शनीक विचाराची मांडणी

Seema Auti
Shareप्रा. मिलिंद बेडसे( इंग्रजी विभाग प्रमुख- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) *परिचय:* देव झालेला कुणी ही दीर्घ...
Read More