Share

हर्षदा हनुमंत मुथे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक
आई….. प्रेमाची, रागाची, त्यागाची, हसण्याची, अन सोसण्याची एकमेव जागा. हक्काने कोणतीही गोष्ट आपण बोलू शकतो तिच्याशी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच आईशी एक वेगळी नाळ जोडलेली असते. जगाला माहित होण्याआधी ९ महिने आपली तिच्याशी ओळख होते….. आपली इवली बाळमुठ हातात घेऊन आपल्यासाठी कितीतरी सहन करण्यासाठी आईचच काळीज हवं.
अशाच एका आई- मुलाच्या निर्मळ नात्याच हे पुस्तक. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्काराची ही एक छोटीशी गोष्ट आहे. यातील प्रत्येक पाठातून नक्कीच उत्तम बोध मिळतो आणि तो बोध कसा घ्यावा याचीही शिकवण अगदी सुंदर मांडलेली आहे. साने गुरुजींनी म्हणटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणूकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करूण व गोड कथात्मक चित्र आहे हे पुस्तक पवित्र आहे, जिव्हाळ्याने ओतप्रोत आहे आणि आचार्य अत्रे असे म्हणतात तसे हे पुस्तक म्हणजे महामंगल स्त्रोत आहे. याबद्दल जितकं लिहावं तितक कमीच आहे. गुरुजींनी तुरुंगात लिहलेल्या या सर्वच रात्री तुम्हाला गहीवरून आणतील……

Related Posts

खंडोबा

Dr Gayatri Satpute
Shareसहाय्यक प्राध्यापक:-खोसे अमोल हरिशचंद्र निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव लेखक नितीन थोरात यांनी खंडोबा या कादंबरीच्या माध्यमातून...
Read More

एक विलक्षण वेधक थरारकथा. प्रेम, मैत्री, परिवार आणि गुन्हा यांची ही कथा

Dr Gayatri Satpute
Shareकेशवने त्याचा बेस्ट फ्रेंड सौरभसोबत एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुरू केली आहे. हे दोन हौशी डिटेक्टिव्ह त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी आणखी...
Read More