श्यामची आई” हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणीवर आधारित असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्काराचे प्रभावी चित्रण करते. साने गुरुजीच्या लेखणीतून आईच्या प्रेमाची, त्यागाचे आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी उलगडते.
कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्याम चे बालपण गरीब पण संस्कारमय कुटुंबात घडते. त्याच्या कुटुबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार बोग्य मिळला नाही. या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते आणि त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. श्यामच्या आईचे ध्येय स्पष्ट होते की, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्ती बनवणे.
आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम निर्माण होते. या पुस्तकाचा शेवट अत्यंत भावनीक आहे. श्यामची आई आजारी पडते आणि अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते. पण तिच्या शिकवणुकीने तो आपले जीवन सत्कारणी लावतो. आईच्या आठवणी त्याला नेहमीच प्रेरणा देतात, “श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे चित्रण करते.
या पुस्तकातुन साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय समाजातील आईच्या भूमिकेचा गौरव करताना, गुरुजींनी तिला नवी ओळख दिली आहे. “शामची आई’ हे पुस्तक केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नाही तर नैतिक मूल्ये, संस्कार भाणि समाजसेवेच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अमुल्य रत्न मानले जाते. या पुस्तकातील एक प्रसंग मला खुप आवडतो. श्यामला पाण्याची भीती वाटते. म्हणून तो पाण्यात पोहणे टाळतो. श्यामला त्याचे मित्र भेकड म्हणून चिडवतात, तेव्हा आई कशी सहन करेल. श्यामची आई त्याला विहरीपाशी नेते, तिथे तो पोहायला शिकतो, याठिकाणी श्यामची आईचे कणखर, कठोर व परोपकारी स्वभावाचे दर्शन घडुन येते. एखादया कसलेल्या कुंभाराप्रमाणे ती आपल्या मुलांना नैतिकदृष्या घडवण्याचा प्रयत्न करते. यातल्या प्रत्येक गोष्टीमधुन गुरुजीनी मोठा व मोलाचा उपदेश देण्याचा व तो तितक्याच सोप्या भाषेत पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना कोकणातील सुसंस्कृत व साध्या कुटुंबाचे व तेथील रम्य संस्कृतीचे वर्णन डोळ्यासमोर उभे राहते. हे पुस्तक वाचताना आपण त्यामध्ये आपली आई शोधण्याचा प्रयत्न करतो व यातील श्यामची आई ही आपलीशी कधी होऊन जाते हे आपल्यालाच कळत नाही. यातील कथा या जरी लहानग्या श्यामभोवती फिरत असल्या तरीही यातील प्रत्येक गोष्टीत आई ही मुख्य नायिका आहे. सावित्री व्रताच्या गोष्टीतील आईचे शब्द मन हेलावून टाकतात, देवाच्या कामाला लाजु नको, पाप करताना लाज धर हे आईचे शब्द प्रत्येकाला निशब्द करतात. सध्याच्या युगात या शब्दाचे मोल खुप मोठे आहे.