महाराष्ट्र राज्यातील दहा महानगरांतील पोलीस आयुक्तालय महिला भरती व पुरुष पोलीस कॉन्स्टेबलची भरती परिक्षा विषयक माहिती या पुस्तकात आहे. सामाजिक जाणिवेतून हे मार्गदर्शक पुस्तक के सागर यांनी लिहिले आहे. पुस्तकात पोलीस पडला मिळणार सामाजिक दर्जा याबद्दल हि लेखकाने मनोगत व्यक्त केले आहे. पोलीस भरती परिक्षा स्पर्धेचाआणि लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा विचार करून हेय पुस्तक लिहिले आहे. या परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी लेखकाने पोलीस भरती परीक्षेची तयारी, मराठी व्याकरण , बुद्धिमापन, अंकगणित, सामान्यज्ञान, आदर्श प्रश्नपत्रिका, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका व चालू घडामोडी अशी या पुस्तकाची रचना साकारली आहे. पोलीस भरती परीक्षेत यश मिळविण्यासाठी हे अत्यंत उपयोगी पुस्तक आहे. नवीन आवृत्ती आत्ताच्या परिक्षेसाठी वापरावी. महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, एसआरपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, आरपीएफ, आरपीएसएफ, तुरुंग रक्षक (जेल पोलीस) इ.वर मार्गदर्शन केले आहे