Share

[10:09 am, 24/01/2025] Meena Dongare: पुस्तकाचे नाव :- सूर्याची सावली

पुस्तकाचे लेखक :- नितीन थोरात

प्रकाशक :- रायतर प्रकाशन

[हे पुस्तक १ जानेवारी 2025 रोजी प्रकाशित झाले

बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वडासारखा शांत, संयमी आणि स्थिरगंभीर पाऊस – वाऱ्याला आव्हान देत, कडाडत्या विजेकडे डोळे वटारून बघणारा, बाप असतो सूर्याविरुद्‌ध यु‌द्ध पुकारणारा उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवित लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा

बाप बाहेरून वाटतो कठोर, गंभीर, रागीट, क्लिष्ट, पण त्याच्या आतील लाजाळूची संवेदना आपल्याला कधी कळतच नाही. नव्हे नव्हे तर तो बाप ती कधी आपल्याला जानवुच देत नाही, कळूही देत नाही. आपल्या कुटुंबासाठी, लेकरासाठी तो आयुष्यभर कितीतरी खस्ता खात असतो, आणि आपल्या कष्टाच्या घामाच्या निरनिराळ्या रंगाने आपल्याती लेकरांच आयुष्य अगदी इंद्रधनुष्यासारखं उंच आणि रंगीत बनवण्याचं तो स्वप्न पाहत असतो. आभाळाएवढ्या बापाची माया कि तीही धो-धो पाऊस कोसळला तरीही आपल्याला कळणार नाही कारण तो धो-धो पाऊस आपल्याला नेहमी कोरडाच दिसतो. या ही
[10:12 am, 24/01/2025] Meena Dongare: या.,.. आभाळाच्या काळजातील ओलावा आपल्याला कधीच दिसत नाही, पण त्याच्या नजरेतील कडकडती वीज लगेचच आपल्यासमोर लखलखाट करून जाते.

अशाच एका बापाची, आपल्या लेकरासाठी जीवाचं रान करणाऱ्या साजबाची ही गोष्ट. बाप काय असतो, हे बापाच्या भूमिकेत गेल्याशिवाय समजत नाही. आपल्या आयुष्यात असणारी बापाची भूमिका किती महत्वाची आसते. वेळप्रसंगी बाप आपल्या लेकरासाठी कोणते संकटे अंगावरती घेऊ शकतो हे सर्व या पुस्तकात लेखकांनी लिहिलेले आहे. सूर्याची सावली है शिर्षक आपले वडिल अरून म्हणजेच सूर्य आणि आईच्चेोनाव छाया म्हणजेच सावली यांच्या नावावरून घेतलेले असे कवि सांगतात. सूर्याचे आणि सावलीचं नातं जसं आजरामर आहे तसंच बापलेकाचं नातंही भावनेने बांधलेले आहे. सूर्याची सावलीमध्ये अशाच भावनेच्या धाग्यानं साजाबा हे पात्र बापाच्या गुंफलेलं आहे. भावना जिवंतगान करत कादंबरीतील प्रवास करतं. अंधश्रद्‌धा आणि मानवी भावना यांचा समतोल साधत आयुष्य जगणे ही तर खरी महाकठीण बाब. पण पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातली आई जन्म घेते.

नियतीनं सगळकाही हिरावून नेलं असताना आपल्या लेकराचं पोट भरावं, बायकोनेही दोन घास खावे यासाठी मिळेल ते काम कख्यासाठी साजबा तयार असतो, वनवन भटकत असताना नशीब या जोडप्याला आणि त्यांच्या लेकराला एका भलत्याच गावी आणून सोडते आणि मग रथून सुरू होतो प्रवास अंधश्रद्‌धेचा । विरोधी असलेल्या सानबाची देवऋषी बनण्याकडचा…..

लेकाला समृ‌द्ध करण्यासाठी आईबापाला डोंगर खोदायची वेळ आली तरी लेकाच्या एका गोड
[10:16 am, 24/01/2025] Meena Dongare: हास्थातून सारा शीण गायब होत असतो. पोराला शिकवव्यासागे, मोठे करण्यासारी, डॉक्टर बनवव्यासाडी तो कोणताही धंदा करायला तयार होता. पण “तो फक्त दूरचं पाहत राहिला, जवळच पहायचच राहून गेला,” आणि સગ દાડત જાભતય, लेकराला डॉक्टर बनवण्यासाठी लागणारा पैसा कमवव्यासारी जो हांदा निवडला शेवटी तोच नाशाचा कारण ठरला. मुलाला पैसा लागेल, या नादात त्याला पोषक वातावरणही लागेल हे त्याच्या ध्यानातच नाही आलं आबि मग तुडुंब भरलेल्या त्या गावांत, अंधश्रद्‌‌धेमुळेच साजबाचा आणि त्याच्या स्वप्नांचा दोघांचाही जाहा होतो.

बाप लेकाच्या याच अफाट प्रेमाच्या सागराला सूर्याची सावलीत मूर्त रूप लाभलं आहे.

राज्यशासन पुरस्कार प्राप्त असणारी ही कादंबरी मनाचा ठाव होतल्याशिवाय राहत नाही.

Recommended Posts

Ikigai

Meena Dongare
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

Meena Dongare
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More