Dr. Bhausaheb Shelke
स्वतिक – स्वतिक हे पावित्र्याच
निदर्शक. स्वस्तिक या चिन्हात सत्य , शिव, सुंदर सामावलेले आहे .
स्वस्तीकाची पावले तीमिराकडून तेजाकडे,
अमंगलकडून मंगलाकडे आणि शुण्याकडून पूर्णत्वाकडे
वाटचाल करणारी असतात.
स्वस्तिकाची पावले -हे पुस्तक वाचल्यानंतर मन
सुखाऊन जात आणि काळजीही करायला लावत.
लेखक हलसगीकर यांनी स्वस्ति याचा अर्थ हि या
पुस्तकात मांडला आहे. स्वस्ति म्हंजे कल्याण, उत्कर्ष,
क्षेम आणि आशीर्वाद व स्वस्तिक हे या गुणांचं शुभचिन्ह
. सर्वे पि सुखिन सन्तु हा स्वस्तिकाची पावलांचा मंत्र
आहे. कोसळलेल उभ कराव, विझालेलेल चेतवाव,
वठलेल चैतन्यमय कराव , सम्ब्रमिताना दिशादर्शक
व्हावं आणि गुण्यागोविंदान नांदव हि लेखकाची धारणा
आहे. स्वस्तिकाची पावले सद्गुणांची निर्मोहाची
प्रगतीची, सदाचाराची आणि समाधानाची पावले
आहेत. पाऊस पडून गेल्यावर काही हिरव उगून यावं
त्याप्रमाणे स्वस्तिकाची पावले या लेखसंग्रहातील
लेखामध्ये आहे . म्हणून तर लेखक म्हणतात कि
मनोभूमितील काहीतरी सफल उगून यावं यासाठी हे
पुस्तक नक्की वाचावं. यातील फुलपाखराचा जन्म,
शुभसंकेत, माझे गुरु, तेंव्हाची तू, यासारखा सर्फ्वाच
कथा लेख संग्रह मन थोडे ओले करुण जात्तात.