Share

ब्रिटिशकाळात परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर ठरल्या. मात्र ही भरारी घेण्यासाठी त्यांनी त्या काळी किती कष्ट घेतले, अवहेलना, त्रास भोगला हे काशीबाई कानिटकर यांनी लिहिलेल्या ‘डॉ . आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे ‘ या चरित्रातून समजते. गोपाळराव जोशी या विधुर समाजसुधारकाशी तेराव्या वर्षी यमुनाबाई यांचा विवाह झालाआणि त्या आनंदीबाई जोशी झाल्या. गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिक्षण देण्याचा चंगच बांधला होता. मराठीप्रमाणेच त्यांनी आनंदीबाईंना इंग्रजीचेही शिक्षण दिले. त्यांना शिकणे शक्य व्हावे म्हणून कल्याणहून मुंबई, कोल्हापूर येथे बदली करवून घेतली. कलकत्ता मुक्कामी मिसेस पी. एफ. कारपेंटर आणि आनंदीबाई यांना झालेला पत्रव्यवहार, डॉक्टर होण्यासाठी आनंदीबाईंचे अमेरिकेत प्रयाण, गोपाळराव व आनंदीबाई यांचा पत्रव्यवहार, अमेरिकेतील यांचे वास्तव्य, शिक्षण , स्वदेशात परतण्याची तयारी, त्यांचे आजारपण व त्यात पडलेली मृत्यूशी गाठ ही सर्व माहिती यातून मिळते.

Related Posts

चाणक्य

Dr. Rupali Phule
Share(ग्रंथपाल )पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी...
Read More