Book Review : Dr. Bhamare Kaveri Bapurao ,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts, Science and Commerce College Panchvati, Nashik
“कंबोडियाचा प्रवास: इतिहास, संस्कृती आणि जिद्दीचा संगम”
“प्रवासवर्णन: कंबोडयान” हे पुस्तक लेखक रवी वाळेकर यांचे उत्कृष्ट प्रवासवर्णन आहे. या पुस्तकात त्यांनी कंबोडियाच्या निसर्गसौंदर्य, संस्कृती, इतिहास, आणि जनजीवन यांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे.
कंबोडियाचा प्राचीन इतिहास, विशेषतः अंगकोर वॉट आणि अंगकोर थॉम यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवरील प्रकाश टाकताना लेखकाने कंबोडियाच्या वैभवशाली संस्कृतीचा मागोवा घेतला आहे. तसेच, तेथील स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनातील साधेपणा, त्यांचे चालीरीती आणि परंपरा यांचे जिवंत चित्रण पुस्तकात पाहायला मिळते.
लेखकाने प्रवासादरम्यान अनुभवलेल्या विविध घटनांद्वारे कंबोडियाची अपरिचित बाजूही वाचकांसमोर आणली आहे. सोप्या व प्रवाही भाषेत लिहिलेले हे पुस्तक वाचकांना कंबोडियाचा आभास देतं.
हे पुस्तक प्रवासवर्णनाची आवड असणाऱ्या तसेच भटकंती आणि इतिहासप्रेमींना नक्कीच आवडेल.